नारळापासून कल्परस मिळवण्याची शास्त्रशुद्ध पद्धती व उपकरण केरळ येथील सेंट्रल प्लॅंटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केले आहे. केवळ नारळ उत्पादनाऐवजी कल्परस(निरा)चे उत्पादन घेतल्यास त्यातून मध, साखर, गुळासह विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. त्यातून केवळ नारळ विक्री करण्याच्या तुलनेमध्ये दहा पट अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. नारळाच्या खोडापासून मिळवलेला रस म्हणजेच निरा. याला केरळमध्ये ‘कल्परस’ असेही म्हटले जाते. हा रस शर्करा, प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असून, आरोग्यदायी मानला जातो. खोडातून येणारा रस हा अत्यंत सावकाश जमा होत असल्याने या काळामध्ये क्विण्वनाची प्रक्रिया सुरू होऊन रस खराब होण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा खराब झालेल्या रसाला ‘ताडी’ असे म्हणतात. खराब न होता निरा मिळवणे हे त्यामुळेच आव्हान ठरते. शुद्ध अवस्थेत रस गोळा करण्यासह त्याचा ताजेपणा टिकविण्यासाठी केरळ राज्यातील कासारगौड येथील सेंट्रल प्लॅंटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट येथील संशोधकांनी ‘कोको सॅप चिलर’ विकसित केला आहे.
नारळला प्रति वर्ष १२ ते १४ वेळा म्हणजेच सरासरी महिन्यातून एकदा स्पॅंडिक्स (spadix) येतो. त्यापासून ६० ते ६७.५ लिटर रस केवळ ४० ते ४५ दिवसामध्ये मिळू शकतो. मात्र, त्याची प्रति दिन क्षमता केवळ १.५ लिटर इतकीच आहे. केवळ नारळ विकण्याच्या तुलनेमध्ये कल्परस विकण्यातून शेतकऱ्यांना १० पट अधिक फायदा मिळू शकतो. असा मिळवता येतो रस पक्व झालेल्या नारळातील पाण्याच्या तुलनेमध्ये या रसामध्ये पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. तसेच झाडाच्या शरीरशास्त्रानुसार फुलोऱ्यापासून नारळ मिळवण्यापेक्षा रस मिळवणे अधिक कार्यक्षम ठरते.
नारळाच्या झाडांपासून शक्य तितक्या लवकर रस मिळवण्यास सुरवात केल्यास उत्पादनामध्ये अधिक स्थिरता मिळू शकते. अपक्व अवस्थेतील फुलोऱ्यापासून रस मिळवतात. सुमारे ६० सेंमी लांबीच्या स्पॅथमध्ये मादी फुलांची निर्मिती होत असताना त्याच्या मुळाशी फुगवटा येतो. ही स्थिती रस काढण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असते.
रस काढण्यासाठी फुलोरा सुती अथवा प्लॅस्टिकच्या दोराने एकत्रित बांधून घ्यावा. एक आठवडा मॅलेट किंवा हाताच्या तळव्याचा वापर करून सकाळी आणि संध्याकाळी असा दिवसातून दोन वेळा मसाज करावा. चार ते पाच दिवस असे हलवल्यानंतर टोकाकडून ७ ते १० सेंमी भाग तोडून टाकावा. या भागातून एक किंवा दोन दिवसांमध्ये रस गळण्यास सुरवात होईल. रस मिळविण्याची ‘सीपीसीआरआय’ची आधुनिक पद्धती वरील प्रकारे कापलेल्या भागामध्ये एक पीव्हीसी कलेक्टर व कोको सॅप चिलर बसविण्यात येतो. यात माती, धूळ, पानांचे रस मिसळले जात नाही. पीव्हीसी कलेक्टर ः साधारणतः ५० ते ६३ मिमी व्यासाचा पीव्हीसी पाइप (स्पँडिक्सच्या आकाराप्रमाणे त्याचा आकार निवडावा.) त्याच्या एका टोकाला एन्ड कॅप लावून बंद करावा. त्यातून रस मिळविण्यासाठी टोकदार आटे असलेला ३ मि.मी. व्यासाला प्लॅस्टिक पाइप बसवावा. या पाइपच्या २० मिमी वर १० मिमी व्यासाचा गोलाकार पाइप बसवलेला आहे. हे कनेक्टर आट्याच्या साह्याने आवळून कठीण पाइपच्या तळापर्यंत बसवला जातो. त्यामुळे १० मिमी व्यासाच्या पाइपमधून येणारा रस मोठ्या पाइपमध्ये साठवला जातो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीमध्ये रस गोळा करण्यासाठी माती, चिकट घटक किंवा पानांचा चिक लावण्याचा त्रास वाचतो. कोको सॅप चिलर ः हे एक छोटेसे उपकरण असून, त्यात एक पोकळ पीव्हीसी पाइपला जोडून एक खोके असते. त्यामध्ये बर्फाच्या खड्याने व्यापलेले एक भांडे रस साठवण्यासाठी ठेवलेले असते. हे २ लिटर क्षमतेचे भांडे सहजतेने काढता व लावता येते. या पाइपच्या सर्व बाजू या उष्णतारोधक जॅकेटच्या साह्याने गुंडाळल्या जातात. त्यामुळे आतील तापमान २ ते ३ अंश सेल्सिअस इतके कमी राहते. फक्त स्पॅडिक्स होल्टर तेवढा उघडा असतो.
कोको सॅप चिलरच्या साह्याने रस गोळा करण्याची पद्धत वर उल्लेखल्याप्रमाणे नारळाचे स्पॅडिक्स तयार करून घ्यावेत. त्यातून रस गळण्यास सुरवात झाल्यानंतर सॅप कलेक्टर जोडावा. वातावरणानुसार अर्धा ते पाऊण किलो बर्फाचे तुकडे किंवा ३ ते ४ जेल आइस पॅकेट चिलरच्या आतमध्ये टाकावेत. त्यात ठेवलेल्या ओ रिंगमध्ये फूड ग्रेडच्या प्लॅस्टिकचे भांडे किंवा पाऊच ठेवावे. ओ रिंगच्या आधी एक स्टिक किंवा प्लॅस्टिकची गाळणी लावावी. त्यामुळे रसामध्ये अन्य पराग किंवा वनस्पतीजन्य घटक मिसळले जात नाहीत. स्पॅंडिक्स हे स्पॅंडिक्स होल्डरमध्ये घुसवून बसवावा. त्यावेळी तोडलेला भाग नेमका गाळणीच्या वर मध्यावर येईल, याची काळजी घ्यावी. यात मुंग्या किंवा अन्य कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी रेक्झीन किंवा प्लॅस्टिक आवरण घालावे. तसेच खोक्याचे वरील तोंड लीडच्या साह्याने बंद करावे. हे खोके सोबत दिलेल्या हॅण्डलच्या साह्याने खोडाला बांधावे. रस गोळा करण्याच्या सुरवातीच्या काही दिवसामध्ये स्पॅंडिक्स हे उभ्या स्थितीमध्ये राहिल असे पाहावे. त्यामुळे त्यातून गळणारा रस हा कनेक्टरच्या साह्याने पीव्हीसी कलेक्टरमध्ये गोळा होतो. नंतर काही दिवसानी कनेक्टरची गरज राहत नाही. रसाने भरलेले भांडे दिवसातून दोनदा (सकाळी आणि संध्याकाळी) काढून घ्यावे. त्यातून रस वेगळ्या अाइस बॉक्समध्ये गोळा करावा. या सर्व प्रक्रियेमध्ये स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.
कोको सॅपचिलरच्या साह्याने रस गोळा करण्याचे फायदे
कल्परसाचे उत्पादन
कल्परसाचे प्रमाण
रसाचे गुणधर्म व निकष ः
कल्परसापासून मूल्यवर्धित पदार्थ ः
व्यावसायिक महत्त्व ः १) कल्परस (निरा) ः हे नैसर्गिक पेय असून, त्याचे व्यावसायिक मूल्य वाढत आहे. केवळ नारळ उत्पादनाच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. केरळ येथील पलक्कड कोकोनट प्रोड्युसर कं.लि. ही सर्वात मोठ्या नारळ उत्पादक कंपन्यापैकी एक असून, त्यांनी सीपीसीआरआय यांची रस गोळा करण्याची पद्धत स्वीकारली आहे. त्यामुळे अन्य अनेक लोकही त्यांच्या पातळीवर रस गोळा करून, साठवण केंद्रापर्यंत जमा करतात. त्यानंतर त्यांची विक्री मध्यस्थांमार्फत करत आहेत. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असून, स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. २) नारळ साखर ः भारतामध्ये नारळ साखर निर्मिती ही प्रामुख्याने तमिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, लक्षद्वीप बेटे आणि कर्नाटक या राज्यांमध्ये लघू उद्योगाच्या स्वरूपामध्ये होते. इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड हे सर्वात मोठे नारळ साखर उत्पादन देश असून, जागतिक बाजारपेठेमध्ये त्यांचाच दबदबा आहे. डॉ. आर. टी. पाटील, डॉ. के. बी. हेब्बर ramabhau@gmail.com (डॉ. आर. टी. पाटील हे लुधियातील केंद्रीय काढणीपश्चात तंत्रज्ञान संस्थेचे निवृत्त संचालक असून, डॉ. के. बी. हेब्बर हे कासारगौड (केरळ) येथील सेंट्रल प्लॅंटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट येथे विभागप्रमुख आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.