आंतरमशागतीच्या कामासाठी छोटी अवजारे व कृषी यंत्रांचा वापर फायदेशीर ठरू शकतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पामध्ये अनेक आंतरमशागतीची अवजारे विकसित केली आहेत. त्यात मनुष्यचलित, बैलचलित, ट्रॅक्टरचलित, स्वयंचलित व बॅक्टरीचलित अशा ऊर्जेच्या वापरानुसार वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. शेतीची विविध कामे ही वेळेवर आणि तत्परतेने करावी लागतात. हंगामामध्ये पेरणी, आंतर मशागत, कापणी, मळणी यांसारख्या कामाकरिता शेतमजूर आवश्यकता भासते. त्यातही आंतरमशागतीसाठी मजुरांची अधिक आवश्यकता असते. अशा वेळी दामदुप्पट मजुरी देऊनही त्याची उपलब्धता होईलच असे नाही. परिणामी, तणांची वाढ होऊन उत्पादनामध्ये घट होते. केवळ वेळेवर आंतरमशागत केल्यास पिकाच्या उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मूळ पिकापेक्षा तणाची वाढ वेगाने होते. ती जमिनीतील बहुतांश अन्नद्रव्ये शोषून घेतात. हे टाळण्यासाठी आंतरमशागतीच्या कामासाठी छोटी अवजारे व कृषी यंत्रांचा वापर फायदेशीर ठरू शकतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पामध्ये अनेक आंतरमशागतीची अवजारे विकसित केली आहेत. त्यात मनुष्यचलित, बैलचलित, ट्रॅक्टरचलित, स्वयंचलित व बॅक्टरीचलित अशा ऊर्जेच्या वापरानुसार वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. खुरपी
पारंपरिक पद्धतीमध्ये पिकाच्या दोन ओळींतील तण काढण्यासाठी खुरपी हे महत्त्वाचे साधन आहे. खुरपीद्वारे एका दिवसात जवळ जवळ २ गुंठ्यांपर्यंत खुरपणी करता येते. भात, गहू इ. पिकांच्या काढणीसाठी या दातेरी विळ्याचा उपयोग होतो. या विळ्याला वारंवार धार लावण्याची गरज नसते. वजनाला हलके असल्यामुळे वापरण्यास सोपे जाते. ज्वारी, भात, गहू इ. पिकांच्या काढणीसाठी या दातेरी विळ्याचा उपयोग होतो. या विळ्याला वारंवार धार लावायची गरज नाही. वजनाला हलके असल्यामुळे वापरण्यास सोपे जाते. यामध्ये तीन छोटे फण माती व तणाची मुळे ढिले करण्यासाठी बसविलेले असतात. हे यंत्र खुरपणी व आंतरमशागत, दोन ओळींतील निंदणी करण्यासाठी वापरण्यात येते. एका दिवसात सुमारे ०.१५ ते ०.२० हेक्टर क्षेत्राची आंतरमशागत होते. सायकल कोळप्याची किंमत कमी असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही परवडणारे आहे. दातेरी हात कोळपे (मनुष्यचलित)
या कोळप्यामध्ये दातेरी चाक तण ढिले करण्यासाठी वापरले जाते. कोळप्याचे पाते विशिष्ट कोनामध्ये बसविलेले असून, त्याची लांबी २० सें.मी. आहे. पात्याच्या साह्याने ढिले झालेले तण काढले जाते. कोरडवाहू शेती क्षेत्रासाठी या यंत्राची शिफारस करण्यात आली आहे. एका दिवसात होणारे क्षेत्र - ०.१५ ते ०.२० हेक्टर. बैलचलित फुले ऊस आंतरमशागत अवजार
या अवजाराचा उपयोग ऊस पिकामध्ये गवत काढणे, आंतरमशागत आणि भर देण्यासाठी होतो. हे अवजार वजनाने हलके असून, बैलजोडीने सहज ओढले जाते. दोन ओळींतील अंतर ९० ते १०० सें.मी. असणाऱ्या ऊस पिकांसाठी उपयुक्त आहे. स्वयंचलित रोटरी खुरपणी यंत्र
या यंत्राला छोटे स्वतंत्र रोटाव्हेटर आहे. त्यामुळे ऊस, कपाशी यातील तण काढण्यासाठी उपयुक्त. चक्राकार गतीने फिरणारी पाती असल्यामुळे तणनिर्मूलन प्रभावीरीत्या करता येते. या यंत्राच्या साह्याने माती फिरवून वनस्पतीला जास्तत जास्त पोषकद्रव्ये उपलब्ध केले जातात. यामध्ये एक फोर स्ट्रोकचे सिलिंडर असून पाण्यावर थंड होणारे डिझेल इंजिन बसविलेले आहे. यामध्ये १८ पाते असून, ती जमिनीमध्ये १५ सें.मी. पर्यंत खोल जातात. ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र
या यंत्राला तीन छोटे स्वतंत्र रोटाव्हेटर असतात. त्यामुळे ऊस, कपाशी अशा पिकांमध्ये एकाच वेळी तीन ओळींतील तण काढता येते. चक्राकार गतीने फिरणारी पाती असल्यामुळे तणनिर्मूलन प्रभावीरीत्या करता येते. दोन रोटरीमधील अंतर कमी जास्त करता येते. याचा वापर केल्यामुळे वेळेची, पैशाची व श्रमाची बचत होते. हे यंत्र १५ ते २२ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. याच्या साह्याने खोली १५ ते १६ सें.मी. भेटते. ट्रॅक्टरच्या पी.टी.ओ. शाफ्टच्या साह्याने गिअर व चेनच्या साह्याने गती दिली जाते. कमी अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरचलित फुले ऊस आंतरमशागत यंत्र
हे यंत्र १८.०५ अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या साह्याने चालविता येते. या यंत्राने मातीचा वरचा थर फोडणे, उसाला भर देणे व खत पेरणी अशी कामे एकाच वेळी करता येतात. १२० सें.मी. पेक्षा जास्त अंतरावरील उसामध्ये हे यंत्र वापरता येते. ट्रॅक्टरचलित फॉरवर्ड रिव्हर्स रोटाव्हेटर
या यंत्राचा उपयोग प्रामुख्याने ऊस पिकासाठी केला जातो हे यंत्र २.५ ते ३.० फूट सरी पाडते. यामध्ये फॉरवर्ड रिव्हर्स पीटीओचा वापर असल्यामुळे जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो-मेकॅनिकल नियंत्रित तण काढणी यंत्र
रोटरी युनिट दोन झाडांच्या मध्ये व बाहेर हायड्रो-मेकॅनिक यंत्रणेद्वारे सहजपणे कार्य करते. फ्रेमच्या योग्य मांडणीमुळे ट्रॅक्टरचालकास यंत्र व्यवस्थित दिसते. दोन झाडांमधील जागेतील किंवा दोन झाडांच्या ओळींमधील तण काढण्यासाठी उपयुक्त. या यंत्राची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता एका दिवसात सव्वा हेक्टर आहे या यंत्राच्या साह्याने खोली कमी -जास्त करता येते. हाताळण्यास सोपे व सहज वापरता येते. देखभाल व दुरुस्ती खर्च कमी येतो यामध्ये दोन १२ व्होल्ट बॅटरी शृंखलेमध्ये जोडल्यामुळे २४ व्होल्ट तयार होते. हे यंत्र १५ ते २५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. यामध्ये ७ दाते असून, त्यातील ५ स्थिर आहेत आणि उर्वरित २ हे कमी जास्त करता येतात. ट्रॅक्टरचलित इंटर रोटाव्हेटर
एकाच वेळी दोन ओळीतील आंतरमशागत व तण काढणी करता येते. हे यंत्र २.५ ते ३.० फूट रुंद सरीत सहजपणे चालू शकते. - डॉ. तुळशीदास बास्टेवाड, ९४२३३४२९४१, (प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)