Fruit Processing Center: एकीतून उभारले अत्याधुनिक यंत्रसाम्रगीचे सामाईक सुविधा केंद्र
Konkan Hapus Mango: खदकोलकोकणची किनारपट्टी ही आंब्यासह इतर फळपिकांकरिता ओळखली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांचा आंबा पिकात नावलौकीक आहे. देवगड हापूसची जिभेवर रेंगाळणारी अवीट चव, उठावदार रंग आणि हवाहवासा वाटणारा सुवास यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात देवगड हापूस पोहोचला आणि जगप्रसिद्ध देखील झाला.