State Cabinet Decision: भामा आसखेड कालवा रद्द , राज्यात पोकरा २ योजना सुरू करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Cabinet Decisions Maharashtra Today: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पोकरा दोन योजना सुरूकरण्याचा निर्णय घेण्यात आला. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासह ट्रॅक्टर, शेततळे, फळबाग लागवड, वीजपंप, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, पाइपलाइन यांसह कित्येक योजनांचा लाभ घेता येतो.
cabinet meeting
cabinet meeting agrowon
Published on
Updated on

Shinde -Fadanvis Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकरी आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतीवर जोडव्यवसाय करता यावा, तसेच अवजारे आणि विहीर खोदण्यासाठी मदत मिळावी, यासाठी प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिजीनल ॲग्रिकल्चर (पोखरा) प्रकल्प अर्थात राज्यात नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्प नावाने योजना राबविली जात आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमध्ये विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

cabinet meeting
Eknath Shidne : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; मदतीबाबत लवकरच निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीत संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ करण्यात आली. आता हे मानधन १ हजार रुपयांवरून १ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करण्यात आले. त्याचबरोबर मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण तालुक्यांत न्यायालयांची स्थापना आदी निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय...

वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती

शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव

राज्यात 700 ठिकाणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. 210 कोटींच्या निधीला मान्यता.

चांदूर बाजारला सिट्रस इस्टेट

ग्रामपचायतींसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्ष मुदतवाढ

बुलढाणा येथे शासकीय कृषी महाविद्यालय

भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित. 2 कोटी कार्ड्स वाटणार, आता 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ

आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ, करोडो कामगारांना लाभ मिळणार

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. 100 कोटींच्या खर्चास मान्यता.

पूर प्रतिबंधासाठी राज्यातील 1648 किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार

मुंबई मेट्रो-3 मार्गासाठी धारावीचा भुखंड

भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण

मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com