Kadabakutti Machine : नगर जिल्हा परिषदेत एजंटांचा सुळसुळाट

फसवणूक झालेला शेतकरी पारनेर तालुक्यातील आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेत कृषी योजनांच्या लाभ देण्याच्या नावाखाली असे प्रकार घडले आहेत.
Kadabakutti Scheme
Kadabakutti SchemeAgrowon

नगर ः नगर जिल्हा परिषदेत (Nagar ZP) काही दिवसांपासून खासगी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. कर्मचारी असल्याचे भासवत जिल्हा परिषदेतून कडबाकुट्टी (Kadabakutti Scheme) मिळवून देतो, असे सांगून बुधवारी (ता. ११) तर चक्क जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बोलावून शेतकऱ्याकडून (Farmer Fraud) तब्बल दहा हजार रुपये एकाने उकळले. त्यानंतर फाइल आणतो म्हणून गुंगारा दिला.

Kadabakutti Scheme
नगर जिल्हा परिषदेत यंदाही ‘कडबाकुट्टी’ चर्चेत

फसवणूक झालेला शेतकरी पारनेर तालुक्यातील आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेत कृषी योजनांच्या लाभ देण्याच्या नावाखाली असे प्रकार घडले आहेत. शेतकऱ्यांकडून तोतया कर्मचारी पैसे उकळतात. या बाबत शेतकऱ्यांनी लेखी तक्रारीही केल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही.

Kadabakutti Scheme
नगर जिल्हा परिषदेच्या कडबाकुट्टी वाटप नियोजनात असमतोल

नगर जिल्हा परिषदेत सातत्याने योजना मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक होत आहे. आता पुन्हा जिल्हा परिषदेत फसवणुकीचा प्रकार घडला. यापूर्वी अशा तक्रारी पारनेर व नगर तालुक्यांतून आल्या आहेत. त्यावर ठोस कारवाई न झाल्यानेच तोतया कर्मचाऱ्यांचे धाडस वाढले आहे. फसवणूक झालेला शेतकरी कृषी विभागात खातरजमा करण्यासाठी गेल्यानंतर आपण फसवलो गेल्याचे त्याच्या लक्षात आले.

Kadabakutti Scheme
नगर : ‘कडबाकुट्टी’ यंत्राचा ४८८ जणांना लाभ

कडबाकुट्टी लगेच मिळवून देतो, माझ्यावर विश्‍वास बसत नसेल तर जिल्हा परिषेदत या, असे त्याने शेतकऱ्यांना भासवले होते. शेतकरी जिल्हा परिषदेत गेल्यावर त्याने, समोर कॅमेरे आहेत, तुम्ही स्वच्छतागृहात या. तेथे शेतकऱ्याकडून दहा हजार रुपये घेतले. तुम्ही इथेच थांबा, मी फाइल घेऊन येतो, असे सांगून त्या तोतया कर्मचाऱ्याने गुंगारा दिला.

बराच वेळ झाल्यानंतरही तो कर्मचारी येत नसल्याने त्या शेतकऱ्याने शोधाशोध सुरू केली. कृषी विभागात चौकशी केल्यावर, त्यांनी वर्णन केल्यानुसार कोणताच कर्मचारी नसल्याचे समजले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ते तपासून संबंधित तोतयावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कर्मचारी असल्याचे भासवतात

नगर, पारनेरसह अन्य भागांत जिल्हा परिषदेचे कर्मचारी असल्याचे काही जण भासवत आहेत. ते शेतकऱ्यांना ४० हजारांची कडबाकुट्टी १० हजार रुपयांत देत असल्याची बतावणी करतात. त्यातून शेतकरी त्यांच्या जाळ्यात फसले जातात. या तोतयाने, आपल्यावर विश्‍वास बसावा म्हणून थेट जिल्हा परिषद मुख्यालयात बोलाविले होते. यापूर्वी कृषी विभागाने फसवेगिरीबद्दल पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र त्याचा शोध लागला नाही.

जिल्हा परिषदेतून योजनांचे अर्ज ऑनलाइन मागविले जातात. त्यातून अर्जांची लॉटरी काढली जाते. त्यामुळे कोणाच्या वशिल्याची गरजच लागत नाही. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्याच नव्हे, तर कोणत्याही योजनेच्या लाभासाठी एजंटांना अथवा तोतयांना पैसे देऊ नयेत.

- संभाजी लांगोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com