Pradhan Mantri Matsya Sampada Yojana : मासळी उतरविण्याच्या ४५ केंद्रांना ‘सागरमित्र’ची साथ

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जिल्ह्यात मासळी उतरवण्याच्या ४५ केंद्रांवर सागरमित्र या पदाची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे.
 fish farming
fish farmingAgrowon
Published on
Updated on

Mahad News : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) जिल्ह्यात मासळी उतरवण्याच्या ४५ केंद्रांवर सागरमित्र या पदाची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक किनारपट्टीवरील मच्छीमार गावातील उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

सागरमित्र हे सरकार आणि मच्छीमार यांच्यातील दुवा असणार आहेत. मच्छीमारांच्या मत्स्यव्यवसाय संबंधित मागण्या आणि सेवांची माहिती देण्याचे काम सागरमित्र करतील.

स्थानिक मच्छीमारांमध्ये विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमांबाबत जनजागृती करणे, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थींना प्रोत्साहन देणे, मत्स्योत्पादन संकलनाचे काम पाहणे, मत्स्योत्पादन, मत्स्य किमती इ. माहितीचे संकलन करणे, मच्छीमारांना प्रशिक्षण आणि क्षमता वाढीसाठी गतिशील करणे, यांसारखी कामे सागरमित्र करणार आहेत.

 fish farming
Decrease In Fish : मुरूड तालुक्यात मासळीत घट

सागरमित्र पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी बारावी विज्ञान उत्तीर्ण अनिवार्य आहे. ज्या उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता जास्त असेल, त्यास प्राधान्य दिले जाईल. मत्स्यविज्ञान पदविका उत्तीर्ण उमेदवार हा बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण समकक्ष ग्राह्य धरण्यात येईल.

त्या उमेदवारासही प्राधान्य देण्यात येईल. अर्जदारांचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे. स्थानिक किनारपट्टीवरील मच्छीमार गावातील उमेदवारांना आणि महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

या ठिकाणी असणार सागरमित्र

उरण : उलवे-मोहा, दिघोडे, केळवणे, वरेडी, करंजा, नवापाडा, मोरा, मोरावे-गव्हाण, हनुमान कोळीवाडा, आवरे.

अलिबाग : धरमतर, अलिबाग, थळ, नवगाव, आग्राव, रेवस गदिना, सासवणे, वर्सोली चाळमाळा, साखर आक्षी, थेरोंडा, रेवदांडा.

मुरूड : साळाव, कोर्लई, बोर्ली मांडला, न्हावे, चोरढे, नांदगाव-मजगाव, मुरूड, एकदरा, राजपुरी, खामदे, आगरदांडा.

श्रीवर्धन : दिघी, वाशी, कुडगाव, आदगाव, मेंदडी, खरसई, पाभरे, खारगाव, भरडखोल-दिवेआगार, बागमांडला, शेखाडी, जिवना, मूळगाव दांडा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com