Horticulture : ‘रोहयो’मधून फळबाग लागवडीचा मार्ग मोकळा

कृषी विभागाने यंदा २०२२-२३ वर्षभरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (रोहयो) योजनेतून फळबाग लागवड करण्याचा मार्ग मोकळा झाले आहे.
Horticulture
Horticulture Agrowon
Published on
Updated on

नगर ः कृषी विभागाने (Agriculture Department) यंदा २०२२-२३ वर्षभरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (MANREGA) (रोहयो) योजनेतून फळबाग लागवड (Orchard Cultivation) करण्याचा मार्ग मोकळा झाले आहे. नव्याने निश्‍चित केलेल्या २५६ रुपये प्रतिदिन मजुरीनुसार सुधारित मापदंडानुसार सुधारित खर्चाच्या अंदाजपत्रकाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अप्पर मुख्य सचिवांनी मंजुरी दिली आहे. मात्र या वेळी रासायनिक खताचा (Fertilizer) खर्च वगळला आहे.

अकुशल व कुशल बाबतचा ६० ः ४० चे प्रमाणही कमी केल्याने सामग्रीचे पैसे कमी झाले. यंदा शेतात अमृत महोत्सवानिमित्त फळबाग लागवड करण्याचे सरकार आवाहन करत असले तरी ‘रोहयो’तील अन्य कामाच्या तुलनेत फळबाग लागवडीत सुधारित मापदंडातही शेतकऱ्यांना पैसे कमीच मिळणार असल्याचे दिसतेय.

Horticulture
Banana : केळीसाठी ‘मनरेगा’ची होणार अंमलबजावणी

‘रोहयो’तून राज्यात तीन वर्षांपासून फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या वर्षी राज्यात ४२ हजार हेक्टरवर लागवड झाली. यंदा ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे नियोजन केले. मात्र ‘रोहयो’च्या मजुरीत वाढ झाली. सुधारित मापदंडानुसार सुधारित खर्चाच्या अंदाजपत्रकाला वरिष्ठ पातळीवर मंजुरी नसल्याने फळबाग लागवड ठप्प होती. या बाबत ‘अॅग्रोवन’ने सातत्याने वृत्त प्रकाशित केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांत हालचाली सुरू झाल्या आणि ‘रोहयो’चे अप्पर मुख्य सचीव नंद कुमार यांनी सुधारित मापदंडानुसारच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.

Horticulture
Horticulture : वयाच्या शहात्तरीत समृध्द फळबाग, लाखीबाग

पूर्वी २४८ रुपये दर होता आता तो २५६ रुपये झाला आहे. त्यामुळे नव्या दरानुसार मॉडेल अंदाजपत्रक मंजूर झाले असले तरी त्यात अनेक बाबी अडचणीच्या आहेत. कृषी विभागाने दरवेळीप्रमाणे रासायनिक खताचा खर्च प्रस्तावात दिला होता. रोहयो विभागाने तो वगळून मापदंड निश्‍चित केले आहेत. रासायनिक खताऐवजी नापेड व व्हर्मी कंपोस्ट खत वापरा, गरज पडली तर स्वः खर्चाने रासायनिक खते टाका, असा सल्ला दिला आहे.

कुशल, अकुशलचा असमतोल

‘रोहयो’तून केल्या जाणाऱ्या कामांत साधारणपणे मजुरीवर खर्च करण्यासाठी अकुशलमधून ६० टक्के व तर यंत्राने वा अन्य बाबीसाठी कुशलमधून ४० टक्के, असा समतोल आहे. मात्र नव्या मापदंडानुसार कुशल, अकुशलचा समतोल कमी-जास्त आहे. अकुशलमधून मजुरीसाठी तर कुशलमध्ये सामग्रीसाठी पैसे दिले जातात. रासायनिक खताचा खर्च सामग्रीत येतो, तो वगळला आहे. त्यामुळे कुशलचे टक्केवारीतील प्रमाण कमी केल्याने त्याचे पैसे कमी मिळतील. त्याचा परिणाम फळबाग लागवडीवर होईल. ‘रोहयो’मधून केल्या जाणाऱ्या कामांत ६० ः ४० चे प्रमाण असताना फळबाग लागवडीबाबतच असे प्रमाण का, असा प्रश्‍न आहे.

तीन वर्षांत मिळणारे एकूण सामग्रीसह अनुदान (हेक्टरी)

आंबा (रोपे) ः १,७८, ७६९, (कलमे) ः २३३९७३, काजू (कलमे) ः १४७६६०, चिकू कलमे ः १९३२०७, पेरू (कलमे) ः १६४०६४, (रोपे) ः २६९९३२, डाळिंब (कलमे) ः २६६७१२, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे ः १,९२,२२४, नारळ रोपे (बाणावली व टी. डी.) ः १,७१,४२३ व १,७५,०२३, बोर रोपे ः १,३५,८४३, १,४४,८२४ व १,१३,०७५, सीताफळ (रोपे) ः १,५७,४२९, (कलमे) ः १,६९,४२९, कागदी लिंबू (रोपे) ः १,८२,२०७, चिंचकलमे (विकसित) ः १,२९,०३२, चिंच, कवठ, जांभुळ रोपे ः १,३०,३३२, जांभुळ कलमे ः १,३५,७३२, कोकम रोपे ः १,१४,१७७, कलमे ः १,१७,७७७, फणस रोपे ः १,०७,१९० कलमेः १,१०,९९०, अंजीर कलमे ः १,६५,८७०, सुपारी ः २,०९,९५३, शेवगा ः १,०४,१४२, बांबू ः १,१२,३६०, साग ः १,२४,४५०, औषधी वनस्पती ः ७७,०८८, पानपिंपरी ः ९५,३१६, शिंदी ः १,०९,४३४, जट्रोपा रोपे ः ८६,०६१, गीरीपुष्प ः ९५,८७२, कडुनिंब ः ७७,७७८, हदगा ः ९९२१४, कढीपत्ता ः ७२,२९६, ड्रॅगनफ्रूट ः २,२८७३१ अव्हॅकेडो ः १,६५,२९९, केळी ः २,५६,३९५, द्राक्ष ः २,७७,८६४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com