‘रोहयो’तून ५५ हजार हेक्टरवर फळबाग लागवड

शेतकरी फळबाग लागवडीला प्राधान्य देत असल्याने यंदा (२०२२-१३) वर्षभरात कृषी विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (रोहयो) योजनेतून ५५ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे नियोजन केले आहे.
Horticulture
HorticultureAgrowon
Published on
Updated on

नगरः शेतकरी फळबाग लागवडीला प्राधान्य देत असल्याने यंदा (२०२२-१३) वर्षभरात कृषी विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (रोहयो) योजनेतून ५५ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे नियोजन केले आहे. त्यानुसार वर्षभरात कोणत्या महिन्यात काय करायचे याचे वेळापत्रकही दिले आहे. गेल्या वर्षी साठ हजारांचे उद्दिष्ट होते, त्यातील सुमारे ४२ हजार हेक्टरवर लागवड झाली.

राज्यात शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीला प्राधान्य दिले आहे. पाच एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड करण्यासाठी असलेली स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बंद असली तरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राज्यात तीन वर्षांपासून फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.

कृषिमंत्री दादा भुसे, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, कृषी विस्तार संचालक विकास पाटील, फलोत्पादन संचालक कैलास मोते यांच्या कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपासून फळबाग लागवड क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी उपक्रम राबवले आणि लागवडीतून त्याचे परिणाम दिसले.

यंदा शासनाने लागवड क्षेत्र आणि अन्य काही बाबीत बदल केला आहे. दोन वर्षांपूर्वी ३८ हजार हेक्टरवर, तर गेल्या वर्षी ४२ हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली. या वर्षी वर्षभरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ५५ हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे नियोजन केले आहे.

राज्यात ९ हजार १६९ कृषी सहायक आहे. गेल्या वर्षी प्रत्येक कृषी सहायकांना फळबाग लागवड करण्याबाबत उद्दिष्ट ठरवून दिले होते. त्यामुळे बऱ्यापैकी फळबाग लागवड झाली. त्याच धर्तीवर यंदाही फळबाग लागवडीचे कृषी सहायकांना उद्दिष्ट दिले आहे.

...असे आहे वार्षिक नियोजन

  • तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत स्थळ पाहणी व आराखड्यात कामांचा अंतर्भाव ः एप्रिल

  • माती परीक्षणासाठी नमुने घेणे, तांत्रिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून खर्चाचे अंदाजपत्रक व आराखडा तांत्रिक मंजुरी, आराखड्याप्रमाणे प्रशासकीय मंजुरी, काम सुरू करण्याचे आदेश व हजेरीपत्रक निर्गमित करणे, खड्डे खोदणे व इतर कामे ः मे

  • कलमे, रोपांची मागणी नोंदवणे ः जून

  • रोपांची रोपवाटिकापासून शेतापर्यंत वाहतूक, निविष्ठा, औषधे उपलब्ध करणे ः जून, जुलै

  • लागवड ः जून ते नोव्हेंबर

  • आंतरमशागती व खते, औषधाचा वापर ः ऑगस्ट ते ऑक्टोबर

जिल्हानिहाय फळबाग लागवडीचे नियोजन (हेक्टर)

ठाणे ः ९८०, पालघर ः २३५०, रायगड ः २५६०, रत्नागिरी ः४८२०, सिंधुदुर्ग ः ३३२०, नाशिक ः ३२२४, धुळे ः १२५२, नंदुरबार ः १७६८, जळगाव ः १५०२, नगर ः ३२००, सोलापूर ः ३१६८, पुणे ः २०५०, सोलापूर ः ३१६८, सातारा ः १६८०, सांगली ः १२८६, कोल्हापूर ः ५७०, औरंगाबाद ः १२००, जालना ः १६५०, बीड ः ७५०, लातुर ः १२००, उस्मानाबाद ः १११०, नांदेड ः १५९०, परभणी ः १२२०, हिंगोली ः ६९५, बुलडाणा ः १५१५, अकोले ः ९४०, वाशीम ः ७६०, अमरावती ः १७०५, वर्धा ः ९२०, नागपूर ः १२२०, भंडारा ः ६२०, गोंदिया ः ५१५, चंद्रपूर ः १०२०, गडचिरोली ः ७००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com