Farmer Loan Waive : दीड हजार शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्जमुक्त होणार

कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. १०) विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला यश आले आहे.
Farmer Loan Waive
Farmer Loan WaiveAgrowon
Published on
Updated on

Farmer Loan Waive नांदेड : कर्जमाफी योजनेपासून (Loan Waive Scheme) वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शुक्रवारी (ता. १०) विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला यश आले आहे.

कर्जमाफी न मिळालेल्या नांदेड जिल्ह्यातील १ हजार ५८० शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ देण्याचे आश्‍वासन सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.

आमदार अशोक चव्हाण, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार माधवराव जवळगावकर यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती.

याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, की महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध बँकांच्या एक हजार ५८० खातेदार शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही.

Farmer Loan Waive
Farmer Loan Waive : पात्र ८८ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

त्यांच्या कर्जखात्यावरील रक्कम व शासनाकडून आलेली कर्जमाफीची रक्कम यांचा ताळमेळ न जुळल्याने त्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही. या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून, त्यांची एकूण कर्जमाफीची रक्कम २५ ते ३० कोटी रुपये आहे.

कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेअंतर्गत असे ५३६ शेतकरी आहेत. रकमेचा ताळमेळ न जुळल्याने त्यांच्या कर्जमाफीसाठी आलेला ४.०९ कोटी रुपयांचा निधी शासनाकडे परत गेला आहे.

Farmer Loan Waive
Farmer Loan Waive : ‘कर्जमुक्ती’अंतर्गत २५ कोटींवर प्रोत्साहन अनुदान जमा

या शेतकऱ्यांची आधार पडताळणी होऊन आवश्यक ती माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड झालेली आहे. कर्जखाते थकित असल्याने या दीड हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणे कठीण झाले आहे.

या शेतकऱ्यांचा प्रश्‍न सोडविण्याबाबत मागील अडीच वर्षांत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा शासनाकडे प्रस्ताव पाठवला. जिल्हा निबंधक कार्यालयानेही दोन वेळा पत्रे लिहिली.

मात्र सहकार विभागाच्या उदासीनतेमुळे या प्रश्‍नावर अद्याप निर्णय झालेला नाही. पीडित शेतकऱ्यांचा संयम संपत चालला असून, एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. काही शेतकरी न्यायालयात गेले आहेत.

राज्य सरकारने या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट न पाहता ३१ मार्चपूर्वी त्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, जेणेकरून त्यांना पुढील हंगामासाठी कर्ज मिळू शकेल, असे अशोक चव्हाण म्हणाले.

त्यावर उत्तर देताना सहकारमंत्री अतुल सावे यांनी सदर शेतकऱ्यांची ३१ मार्चपर्यंत कर्जमाफी केली जाईल, असे स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com