Government Scheme : शासनाच्या योजनांची गतीने अंमलबजावणी करावी

Deputy Chief Minister Devendra Fadnavis : सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यान्वित यंत्रणांनी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची गांभीर्याने व गतीने अंमलबजावणी करावी.
Government Scheme
Government SchemeAgrowon
Published on: 
Updated on: 

Solapur News : "सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यान्वित यंत्रणांनी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची गांभीर्याने व गतीने अंमलबजावणी करावी. आपले शासन व प्रशासन गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावा,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.२५) येथे दिले.

जिल्ह्यातील विविध योजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, बबनराव शिंदे, शहाजी पाटील, राम सातपुते, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे आदी उपस्थित होते.

Government Scheme
Minister Devendra Fadnavis : सामान्यांना परवडणारी आरोग्य व्यवस्था

फडणवीस म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील अवकाळी पाऊस नुकसान, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना विविध योजनांतून आतापर्यंत ४७२ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. पंतप्रधान किसान योजनेप्रमाणेच नमो किसान योजना सुरू करण्यात येणार आहे. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे कोणतेही पैसे थकित ठेवणार नाही.’’

जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत कामांना गती द्यावी, विहित वेळेत कामे पूर्ण करावीत व कामांच्या दर्जामध्ये कसलीही तडजोड करू नये, असेही निर्देश फडणवीस यांनी दिले. महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी सादरीकरण केले.

विविध योजनांचा घेतला आढावा

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी जलयुक्त शिवार अभियान २.०, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, आवास योजना ग्रामीण व शहरी, जलजीवन मिशन, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या योजनांसह नैसर्गिक आपत्तीअंतर्गत अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा व दिलेल्या मदतीचा आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.