Gharkul Yojana : भूमिहीनांना हक्काची जागा

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर मिळावे, बेघर व्यक्तींनाही त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबवण्यात येते.
Gharkul Scheme
Gharkul SchemeAgrowon

ठाणे : जिल्ह्यातील गोरगरिबांच्या हक्‍कांच्‍या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना (State Government Gharkul Scheme) राबवण्यात येत आहे.

त्यापाठोपाठ आता जिल्ह्यातील बेघर व भूमिहीनांना पंतप्रधान आवास आणि घरकुल योजनेंतर्गत (PM Awas Yojana) जागा उपलब्ध करून देण्यात ठाणे जिल्हा ग्रामीण विकास विभागाला (Department Of Rural Development) यश आले आहे.

त्यानुसार शहापूर तालुक्यातील खर्डी येथील १५ लाभार्थ्यांना हक्काची जागा मिळण्याबाबतच्या प्रस्तावाला ठाणे जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्याने लाभार्थ्यांना जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर मिळावे, बेघर व्यक्तींनाही त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबवण्यात येते.

ठाणे जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकांसह नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात ही योजना राबवली जात आहे.

जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या प्राधान्य क्रम यादीत मालकीची जागा नसलेल्‍या ५४ लाभार्थ्यांची संख्या समोर आली होती.

यापैकी कल्याण तालुक्यातील ३९ भूमिहीन लाभार्थ्यांना महा आवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

शहापूर तालुक्यातील खर्डी येथील १५ लाभार्थींना महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जागा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता.

Gharkul Scheme
Gharkul Yojana : नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार

त्यानुसार या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनीदेखील मान्यता दिली आहे. त्यामुळे खर्डीतील लाभार्थ्यांना जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुलांच्या विविध योजना गतिमान पद्धतीने राबवण्यात येत आहेत. भूमिहीन लाभार्थ्यांच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या कुटुंबियांनाही लवकर जागा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकर जागा उपलब्ध होणार आहे.
छायादेवी शिसोदे, ग्रामीण विकास अधिकारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com