Food Security Mission : ‘अन्नसुरक्षा’अंतर्गत दिंडोरीत डिसेंबरपर्यंत मिळणार धान्य

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत मोफत मिळणाऱ्या या धान्याबाबत लाभार्थ्यांनी रेशन दुकानदारकडून पावती घ्यावी तसेच याबाबत तक्रार असल्यास तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
Ration card
Ration cardAgrowon
Published on
Updated on

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात जानेवारी २०२३ मध्ये अंत्योदय योजना व प्रधान्य कुटुंब योजनेचे एकूण ४९ हजार ४३३ शिधापत्रिका-धारक (Ration card) असून, त्यावर एकूण दोन लाख ३७ हजार ८८१ लाभार्थी आहेत.

अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत (Government Scheme) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित केल्या जाणाऱ्या अन्न धान्यांचा लाभ हे लाभार्थी घेत असून त्यांना तीन रुपये प्रतिकिलो या दराने तांदूळ, दोन रुपये प्रतिकिलो या दराने गहू उपलब्ध करून देण्यात येतो.

तथापी केंद्राने राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून एका वर्षाकरिता मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला असल्याने दिंडोरी तालुक्यात दोन लाख ३७ हजार ८८१ लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत धान्य मिळणार आहे.

तसेच कोरोनाकाळात मोफत दिले जाणारे अन्नधान्य डिसेंबर २०२२ पासून बंद करण्यात आले असून, आता या शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत अंत्योदय योजना व प्रधान्य कुटुंब योजनेचे विकत मिळणारे धान्य १ जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंत मोफत मिळणार आहे.

त्यामुळे लाभार्थ्यांना रेशन दुकानातून धान्य घेताना दुकानदाराला त्यांना मिळणाऱ्या अन्न धान्याच्या बदल्यात पैसे देण्याची गरज नाही.

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत मोफत मिळणाऱ्या या धान्याबाबत लाभार्थ्यांनी रेशन दुकानदारकडून पावती घ्यावी तसेच याबाबत तक्रार असल्यास तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.

Ration card
Diwali Grocery : दिवाळीचा शिधा मिळणार १०० रुपयांत
केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत मोफत नियमित धान्य देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला असून, याबाबतचे आदेश दिंडोरी तालुका पुरवठा विभागाला प्राप्त झाले असून, त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभार्थ्यांना डिसेंबर २०२३ अखेर संपूर्ण धान्य मोफत दिला जाणार आहे.
पंकज पवार, तहसीलदार, दिंडोरी
तालुक्यातील एकूण १७३ रेशन दुकानदारांनच्या वितरणप्रणालीकडून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी जनतेला याचे विनामूल्य वितरण होणार असून, यात काही अडचण आल्यास दिंडोरी तहसील कार्यालयाकडे संपर्क साधावा.
अक्षय लोहारकर, पुरवठा अधिकारी, दिंडोरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com