Farmer Scheme : शेतकऱ्यांना तारण योजनेचा आधार

शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल सहा महिने या गोदामांत ठेवता येतो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून भाडे मात्र घेतले जात नाही.
Farmer Scheme
Farmer SchemeAgrowon

अमरावती : शेतमालांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या (Amaravati APMC) तारण योजनेचा (Mortgage Scheme) आधार घेतला आहे. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी (Soybean Producer Farmer) या योजनेचा अधिक लाभ घेतला असून अमरावती बाजार समितीने २ कोटी ४३ लाखांचे कर्ज (Farmer Loan) शेतकऱ्यांना दिले.

अनेक शेतकऱ्यांकडे शेतीमाल साठवून ठेवण्यासाठी घरी पर्याप्त जागा उपलब्ध नसते. अशावेळी बाजार समितीचे धान्य गोदाम त्यांच्यासाठी मोठा आधार असतो.

शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल सहा महिने या गोदामांत ठेवता येतो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून भाडे मात्र घेतले जात नाही. सात-बारा, आधार कार्ड व बँक पासबुकची सत्यप्रत जमा केल्यावर शेतकऱ्यांना जागा दिली जाते.

या धान्याच्या मोबदल्यात तारण म्हणून हवी असलेली रक्कमही शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजदराने दिली जाते.

अमरावती बाजार समितीने गेल्या १ एप्रिल ते ३० डिसेंबर या कालावधीत २१७ शेतकऱ्यांना २ कोटी ४३ लाख ३३ हजार ५०७ रुपयांचे तारण वाटप केले आहे.

यामध्ये सोयाबीन, हरभरा व तूर उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. सध्या ८६३४ क्विंटल शेतीमाल या गोदामात आहे.

Farmer Scheme
#Shorts : एका तासात ५ एकर क्षेत्रावरील सोयाबीन काढणारे मशिन| ॲग्रोवन

सध्या सोयाबीनला खुल्या बाजारात ५३०० रुपये भाव आहे. सहा हजारांवर अद्याप भाव चढले नसल्याने शेतकऱ्यांनी गरजेपुरती आवक सुरू ठेवली आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदा भाव मिळतील अशी त्यांना अपेक्षा असल्याने बाजारातील आवक अल्प आहे. या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ८३२९ क्विंटल सोयाबीन, १६४ क्विंटल तूर व १४१ क्विंटल हरभरा तारण ठेवले आहे.

शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल वाटेल तेव्हा विक्री करण्याची सोय आहे. त्यासाठी त्याला तारण घेतलेली रक्कम व्याजासह बाजार समितीला परत करावी लागणार आहे.

बाजार समितीची तारण योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक असून शेतीमालाचे भाव वाढल्यावर त्याला विक्रीची मुभा आहे. अल्प व्याजदरात ही सोय उपलब्ध करून दिली असून दरवर्षी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. अधिक संख्येने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे.
पवन देशमुख, प्रभारी निरीक्षक, बाजार समिती अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com