Salokha Yojana : कारलीच्या शेतकरी कुटे कुटुंबाला मिळाला सलोखा योजनेचा लाभ

Salokha Yojana Benefits : शेतकऱ्यांचे गट अदलाबदलीची प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सलोखा योजनेमुळे गट अदलाबदलीचा मार्ग आता सुकर झाला आहे.
Salokha Yojana
Salokha YojanaAgrowon

Washim News : शेत जमिनीच्या ताब्यावरून आणि वहिवाटीवरून शेतकऱ्यांचा आपसातील वाद मिटवून समाजात सलोखा निर्माण होऊन एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीन जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकांचे अदलाबदल दुरुस्तीसाठी नाममात्र मुद्रांक शुल्क आणि नाममात्र नोंदणी फी आकारून सलोखा योजनेचा लाभ वाशीम तालुक्यातील कारली येथील कुटे कुटुंबाला मिळाला.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते दुय्यम निबंधक (मुद्रांक) यांच्याकडील गट अदलाबदलीचे नोंदणीकृत शेतीशी संबंधित असलेली कागदपत्रे शेतकरी कुटुंबातील खातेदारांना देण्यात आली. यावेळी वाशीम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार गजेंद्र मालठाणे व कारलीचे तलाठी राठोड उपस्थित होते.

Salokha Yojana
Custard Apple : सीताफळ उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांमधील वाद मिटला

शेतकऱ्यांचे गट अदलाबदलीची प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सलोखा योजनेमुळे गट अदलाबदलीचा मार्ग आता सुकर झाला आहे. एका आठवड्याच्या आत या योजनेचा लाभ घेता येणे शक्य झाले आहे. शेत जमीनधारकांचे अदलाबदल दुरुस्तीसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये आणि नोंदणी फी नाममात्र एक हजार रुपये या योजनेअंतर्गत आकारण्यात येते.

कारली येथील खातेदाराचा ताबा एका गटात पण खातेदाराचे नाव दुसऱ्या गटात गेले होते. त्यामुळे खातेदाराचा मूळ गट बदलला होता. या योजनेमुळे खातेदारांचे नाव मूळ गटात करून देण्यात आले. त्यामुळे खातेदारांचे नाव सातबारामध्ये मूळ गटात येण्यास मदत झाली.

दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत शेतीची कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चंद्रप्रकाश कुटे, सुनंदा कुटे, गोपाल कुटे व नारायण कुटे यांना देण्यात आली. या शेतकऱ्यांच्या शेतीचे १९८० ला एकत्रीकरण झाले होते.

गटात अदलाबदली करण्यासाठी त्यांना ५० हजार रुपये शासकीय खर्च येणार होता. त्यासाठी काही कालावधी लागणार होता. मात्र या योजनेअंतर्गत नाममात्र दोन हजार रुपये भरून मूळ गट मालकांना त्यांच्या गटाचा ताबा मिळण्यास मदत झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com