PM Kisan
PM KisanAgrowon

PM Kisan : ‘शेतकरी सन्मान’मध्ये १०८ बांगलादेशींची नोंदणी

Agriculture Scheme : ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने’अंतर्गत जिल्ह्यातील डिगस (ता. कुडाळ) येथे तब्बल १०८ बांगलादेशी नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
Published on

Sindhudurg News : ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने’अंतर्गत जिल्ह्यातील डिगस (ता. कुडाळ) येथे तब्बल १०८ बांगलादेशी नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकारामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी चौकशीचे आदेश दिले. कुडाळचे प्रांताधिकारी या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. जिल्ह्यात १ मे २०२३ पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियत्रंणाखाली हे काम सुरू होते.

PM Kisan
PM Kisan Yojana : ‘पीएम किसान’ची मुख्य कामे कृषी विभागाकडे

गावोगावी सध्या या योजनेअंतर्गत ऑनलाइन दाखल अर्जांची पडताळणी सुरू आहे. कुडाळ तालुक्यातील डिगस येथे १०८ बांगलादेशी नागरिकांनी ‘शेतकरी सन्मान’च्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज केल्याचे उघडकीस आले.

PM Kisan
PM Kisan : ८४ हजार शेतकऱ्यांची‘ई-केवायसी’प्रलंबित

जिल्ह्यात आणखी गावांत असा प्रकार घडला का, याची खातरजमा देखील प्रशासन करीत आहे. या प्रकरणाच्या चौकशी समिती प्रमुखपदी कुडाळचे प्रांताधिकारी आहेत. दोन दिवसांत अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ‘केवायसी लिंक’ करण्याची प्रकिया सुरू आहे. या वेळी डिगसमध्ये १०८ बांगलादेशींनी अर्ज केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी समिती दोन दिवसांत अहवाल सादर करेल.
- मच्छिंद्र सुकटे, निवासी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com