Crop Insurance : पीकविमा मुदत वाढली पण अडचणी कायम

Crop Insurance Scheme Deadline : केंद्र सरकारने पीकविमा भरण्यास विशेष बाब म्हणून ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र तरीही पूर्वीच्या समस्या कायमच आहेत.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon

Nashik News : केंद्र सरकारने पीकविमा भरण्यास विशेष बाब म्हणून ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र तरीही पूर्वीच्या समस्या कायमच आहेत. तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे एकीकडे मानसिक आणि दुसऱ्याकडे आर्थिक नुकसानीसह शेतकऱ्यांवर वेळ घालविण्याची वेळ आली आहे.

राज्य शासनाने १ रुपया भरून खरीप हंगामापासून पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला अधिक पैसे देऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. यावर ‘ॲग्रोवन’ने सातत्याने आवाज उठवला. या घोषणेवर टीकेची झोड उठल्यानंतर अखेर राज्य सरकारने कडक कारवाईची पावले उचलली. त्यामुळे अधिक पैसे आकारणाऱ्या सामूहिक सेवा केंद्रांवर कारवाईचे आदेश देण्यात आले.

Crop Insurance
Crop Insurance : पीक विमा योजनेला मुदत वाढ, शेतकऱ्यांना ३ ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज

त्यानंतर हे प्रमाण कमी झाले. मात्र पीकविमा संकेतस्थळावर कामकाज करताना सर्व्हर डाऊन असल्याने वारंवार प्रयत्न करूनही अनेक शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहिले. अखेर राज्य सरकारने विनंती केल्यानंतर केंद्राने मान्य करून विशेष बाब म्हणून ३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली. मात्र अजूनही ‘पहिले पाढे पंचावन्न’ हीच परिस्थिती आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा अर्ज भरण्यास गुरुवारपर्यंत मुदतवाढ

मुदतवाढ नावापुरती ठरण्याची भीती

शेतकऱ्यांना व्यक्तिगतरीत्या पीकविम्याची नोंदणी करताना पूर्ण अर्ज भरल्यानंतर ‘अप्लाय फॉर इन्शुरन्स’ या पर्यायावर क्लिक केले असता पुढे कुठलीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे अडचणी येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तर सामूहिक सेवा केंद्रांवर ही अडचण तुलनेने कमी आहे; मात्र सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण अजूनही तसेच आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. काही ठिकाणी रांगा लागत आहेत. त्यामुळे मुदतवाढ फायद्याची ठरणार की शेतकरी वंचित राहणार, हा प्रश्‍न कायम आहे. ही मुदतवाढ नावापुरती ठरण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

दोन दिवसांपासून सर्व्हर व वेबसाइट डाऊन आहेत. दोन दोन तास वेबसाइट सुरू होत नाही. त्यामुळे सेंटरवर अनेक शेतकऱ्यांनी लाईन लावून नंबर लावले आहेत. तर काहींनी जास्तीचे पैसे देवून रात्रीच्यावेळी पीकविमा अर्ज भरला.
- किरण पवार, शेतकरी, नांदगाव, जि. नाशिक.
पीकविमा अर्ज भरताना संकेतस्थळ दिवसा थंड गतीने काम करते. त्यामुळे हे काम रात्री जागून करावे लागत आहे. राज्य सरकारने तज्ञांची मदत घेऊन सर्व्हरची गती कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा मुदतवाढ १५ ऑगस्टपर्यंत वाढवून द्यावी.
- दीपक पगार, प्रदेशाध्यक्ष, रयत क्रांती संघटना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com