PM kisan KYC
PM kisan KYCAgrowon

PM kisan : शेतकरी सन्मान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा

PM Kisan KYC Update : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा चौदावा हप्ता लवकरच येणार असून, त्यासाठी लाभार्थ्यांनी पुढील दोन दिवसांत ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
Published on

Pune News : ‘‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा चौदावा हप्ता लवकरच येणार असून, त्यासाठी लाभार्थ्यांनी पुढील दोन दिवसांत ई-केवायसी करणे गरजेचे आहे.

ज्यांनी ई -केवायसी केली नाही त्यांनी तातडीने सीएससी केंद्र, महा ई सेवा केंद्र किंवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून प्रक्रिया पूर्ण करवी,’’ असे आवाहन शिरूर तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

PM kisan KYC
PM Kisan Yojana: ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत ई-केवायसी करा’

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही मदत चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपयांच्या स्वरूपात प्राप्त होते. ज्यांचे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत नाव आहे.

मात्र बँकखात्याशी आधारकार्ड लिंक नाही, ते या योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यासाठी बँकखात्याशी आधारकार्ड लिंक करून घ्यावे किंवा पोस्टात आधार बेस खाते उघडून घ्यावे, असे आवाहन ढवळे यांनी केले आहे.

शिरूर तालुक्यातील सर्व गावांतील मिळून एकूण ८१३४ ई-केवायसी प्रलंबित आहेत. तसेच एकूण ८७८० बँक खाती आधारकार्डाशी लिंक करणे बाकी आहे. सर्व शेतकऱ्यांनी हे काम त्वरित पूर्ण करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ढवळे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com