‘प्रकाशा-बुराई’च्या मान्यतेसाठी शासनास साकडे

शिंदखेडा आणि नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारी प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी लवकर बैठक बोलवावी, अशी मागणी आमदार जयकुमार रावल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
Irrigation
IrrigationAgrowon

धुळे : शिंदखेडा आणि नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारी प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला (Prakash Burai Irrigation Scheme) सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी लवकर बैठक बोलवावी, अशी मागणी आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली. तसा निर्णय झाल्यास योजनेचे काम मार्गी लागून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडविता येऊ शकेल, अशी भूमिका आमदार जयकुमार रावल यांनी मांडली आहे.

Irrigation
Irrigation : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा

ते म्हणाले, दशकापूर्वी तापी नदीवर झालेल्या बॅरेजेसमुळे आजही मोठा जलसाठा विनावापर पडून असतो. तसेच पावसाळ्यात डोळ्यांदेखत पाणी समुद्रात वाहून जाते. ते अडवून काही प्रकल्पांमध्ये वळविल्यास सिंचनवृद्धीचा लाभ शेतकऱ्यांच्या पदरात पडू शकेल. शेतापर्यंत जलसाठा पोचविण्यासाठी प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना आकारास आली. त्यामुळे शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यातील तब्बल साच हजार ८५ हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकेल. ही योजना १९९९ ला तत्कालीन युती सरकारच्या काळात मंजूर झाली. परंतु, नंतर आघाडी शासनामुळे ही योजना बारगळली. पुढे २०१४ मध्ये राज्यात भाजपप्रणीत सरकार आल्यावर मी पर्यटन, रोहयो मंत्री असताना सततच्या पाठपुराव्याने या योजनेला गती मिळाली.

Irrigation
Soybean : हळद, मूग, सोयाबीनमध्ये उतरता कल

राज्यात पुन्हा २०१९ मध्ये सत्तांतर झाल्याने योजनेची गती मंदावली. असे असताना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्याने या योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी आहे. कायमस्वरूपी दुष्काळी मानल्या जाणाऱ्या शिंदखेडा मतदारसंघासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.

...अशी योजना, असा लाभ

प्रकाशा बॅरेजेसच्या बुडीत क्षेत्रातून पावसाळ्यात वाहून जाणारे पुराचे पाणी हाटमोहीदा गावाजवळील तापी नदीवर इनटेक चॅनेल व जॅकवेल बांधून उपसाद्वारे उचलले जाईल. ते पाइपलाइनद्वारे पहिल्या टप्प्यात निंभेल साठवण तलावात सोडणे, तर दुसऱ्या टप्प्यात असाणे येथील साठवण तलावात सोडण्याची प्रक्रिया राबविली जाईल. तिसऱ्या टप्प्यात शनिमांडळ येथील साठवण तलावात पाणी सोडले जाईल. तेथून ते मालपूरच्या अमरावती मध्यम प्रकल्पात, तर चौथ्या टप्प्यात बुराई मध्यम प्रकल्पात टाकले जाईल. सुधारित आराखड्यानुसार बलदाणे धरणातही पाणी सोडले जाणार असल्याने सिंचनाचा लाभ वाढेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com