PM Kisan : ‘किसान सन्मान’साठी पोस्टात आधार लिंकिंग सुविधा

Pm Kisan Samman Nidhi Scheme : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थीना १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana
Pradhan Mantri Fasal Bima Yojana Agrowon

PM Kisan Update Sangli News : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थीना १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.

लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावात पोस्टामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil Chavan) यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

राज्यात सद्यःस्थितीत १२ लाख ९१ हजार लाभार्थीची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

यासाठी लाभार्थीनी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana
PM Kisan : गावातील पोस्टात बँक खाते ‘आधार’शी जोडता येणार

ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. ‘आयपीपीबी’मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना अन्यत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

पी.एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती ‘आयपीपीबी’मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या ‘आयपीपीबी’ कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थीना संपर्क करून ‘आयपीपीबी’मध्ये बँक खाती सुरू करतील.

योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी ‘आधार’ संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने ‘आयपीपीबी’मार्फत ते १५ मे २०२३ या कालावधीत यासाठी गावपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com