Groundwater Level : पाच वर्षांत ०.९५ मीटरने भूजलवाढ

जिल्ह्यात पाच वर्षांतील सरासरीनुसार सद्यःस्थितीत केवळ ०.९५ मीटरने भूजल पातळीत वाढ झाली आहे.
Groundwater level increased by 1.19 m
Groundwater level increased by 1.19 m
Published on
Updated on

धुळे ः जिल्ह्यात पाच वर्षांतील सरासरीनुसार सद्यःस्थितीत केवळ ०.९५ मीटरने भूजल पातळीत (Groundwater Level) वाढ झाली आहे. यात धुळे तालुक्यात १.४९,‌ साक्री तालुक्यात १.५१, तर शिंदखेडा तालुक्यात ०.४१, शिरपूर तालुक्यात ०.३८ मीटरने भूजल पातळीत वाढ झाली आहे.

Groundwater level increased by 1.19 m
Farmer Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी करा अर्ज

भूजल पातळी निश्‍चितीकरणासाठी यंदा धुळे तालुक्यातून ३३, साक्री ३१, शिंदखेडा २५, तर शिरपूर तालुक्यातून १८, अशा एकूण १०७ निरीक्षण विहिरी निवडण्यात आल्या. त्या वेळी गेल्या पाच वर्षांतील सरासरी स्थिर भूजल पातळी लक्षात घेण्यात आली. त्यानुसार धुळे तालुक्याची ४.२८ मीटर, साक्री ३.३३, शिंदखेडा ७.३९ आणि शिरपूर तालुक्यात ५.४५ मीटर, याप्रमाणे जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी ५.११ मीटरला स्थिरावल्याचे समोर आले.

Groundwater level increased by 1.19 m
Water Supply Scheme : जलजीवनच्या कामांत आर्थिक गैरव्यवहार?

या स्थितीत सप्टेंबर २०२२ मध्ये धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात अनुक्रमे २.७९, १.८२, ६.९८, ५.०७ याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ४.१६ मीटरवर स्थिर भूजल पातळी असल्याची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत सरासरी ०.९५ मीटरने भूजल पातळीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले.

जिल्ह्यात अग्निजन्य खडक

या संदर्भात भूजल यंत्रणेने सांगितले, की जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थितीमुळे पर्जन्यमानातही विविधता आढळते. जिल्ह्याचा समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रात आहे. वार्षिक सरासरी ५३५ मिलिमीटर पर्जन्यमान आहे. जिल्ह्याचा साधारणतः ९२ टक्के भूभाग अग्निजन्य खडकाने व्यापलेला असून, त्यामध्ये प्रामुख्याने कठीण पाषाण, सच्छिद्र पाषाण व मांजरा पाषाण, असे स्तर आढळून येतात. भूजलाची उपलब्धता ही प्रामुख्याने पाषाणाची झालेली झीज व त्यात असणाऱ्या फटी व भेगा यावर अवलंबून असते. त्यामुळे भूजलाची पातळी निरनिराळ्या क्षेत्रांत निरनिराळी आढळते.

Groundwater level increased by 1.19 m
Rabi Crop Insurance : गेल्या रब्बीसाठीचा १८ कोटी ७८ लाखांचा पीकविमा मंजूर

भूजलची उपलब्धता

जिल्ह्याचा भूजल उपलब्धततेबाबत विचार केल्यास शिरपूर तालुका अत्युत्तम असून, त्या तुलनेत साक्री व शिंदखेडा तालुक्यात भूजल कमी प्रमाणात आढळते. भूजलाच्या नियमित अभ्यासासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने भौगोलिक रचना व भूस्तराच्या आधारावर जिल्ह्याची विभागणी ४५ पाणलोट क्षेत्रात केली आहे. पाणलोटाच्या भौगोलिक रचनेनुसार ४५ पाणलोट क्षेत्रात एकूण १०७ निरिक्षण विहिरी निश्‍चित केल्या आहेत.

जिल्ह्यात पावसाची स्थिती

जिल्ह्यात चारही तालुक्यात यंदा सप्टेंबरपर्यंत सरासरी ५३५.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जून ते सप्टेंबरपर्यंत धुळे तालुक्यात ७२३.३, साक्री ८३२.५, शिंदखेडा ४५३.५ आणि शिरपूर तालुक्यात ५४३.९, अशा एकूण ६४९.३० टक्के पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी अनुक्रमे १३९.६१, १७८.४९, ९०.५९ आणि ८२.४०, अशी एकूण १२१.३४ टक्के आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com