Drought Impact: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीदेखील हळदीला बऱ्यापैकी दर मिळू शकतो. परंतु हा दर राज्यात, देशात नक्की किती उत्पादन घटणार, यावर ठरणार आहे..नव्या हळदीची आवक बाजार समित्यांमध्ये सुरू झाली आहे. हळदीला कुठे २५ हजार, तर कुठे ३० हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळतोय. मागील सुमारे दशकभरापासून हळदीला मिळणाऱ्या मुहूर्ताच्या अधिक दराचीच चर्चा जास्त होते. हा दर बाजारात सुरुवातीला येणाऱ्या अत्यंत कमी हळदीला मिळतो. त्यामुळे मुहूर्ताच्या नाही, तर हंगामात सरासरी हळदीला किती दर मिळाला, हे पाहणे महत्त्वाचे असून त्यावरच अधिकाधिक उत्पादकांना किती लाभ झाला, याचा अंदाज येतो. मागील चार पाच वर्षांच्या सरासरी दराचा आढावा घेतला तर प्रति क्विंटल सात ते आठ हजार रुपये असाच राहिला आहे..Turmeric Price: नवीन हळदीला विक्रमी दर! सांगली बाजार समितीत प्रतिक्विंटल ३० हजार ५०० रुपयांचा भाव.मागच्या वर्षी अतिवृष्टीने हळद पिकाचे मोठे नुकसान झाले. उत्पादनही कमी मिळाल्यामुळे काही ठिकाणी हा दर प्रति क्विंटल १० हजारांच्या पुढे गेले होते. यावर्षी अत्यंत कमी पाऊसमानामुळे हळद पीक संकटात आहे. हळदीला देण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याने काही शेतकऱ्यांनी त्यावर नांगर फिरविला आहे. हळदीला सध्या चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांची ही पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. काही शेतकरी टॅंकरने पाणी घालून हळद पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी देखील हळदीला बऱ्यापैकी दर मिळू शकतो. परंतु हा दर राज्यात, देशात नक्की किती उत्पादन घटणार, यावर ठरणार आहे..कीड-रोगांचा कमी प्रादुर्भाव, वन्य प्राण्यांचा कमी त्रास, हमखास उत्पादन, बऱ्यापैकी दर यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हळद हे पीक इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत आश्वासक वाटत होते. त्यामुळे राज्यात हळदीचे क्षेत्र वाढत गेले. परंतु मागील चार-पाच वर्षांत या पिकांचे लागवड क्षेत्र, उत्पादन आणि बाजारभाव यामध्ये मोठे चढ-उतार पाहावयास मिळतात. एवढेच नाही तर सेलम, वायगाव अशा एक-दोन जाती सोडल्या तर राज्यात लागवडीसाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. लागवडीसाठी दर्जेदार बेण्याची देखील राज्यात मोठी वानवा आहे. .Turmeric Research Center : हळद संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीला चालना : मंत्री आबिटकर.हळदीचे वाफ्यावरील प्रगत लागवड तंत्र आपल्याकडे आहे. परंतु त्याचाही वापर सर्रासपणे सर्व शेतकऱ्यांकडून होताना दिसत नाही. लागवड ते काढणीपर्यंत योग्य नियोजनातून हळदीच्या उत्पादनात एकरी १० क्विंटलपर्यंत वाढ होऊ शकते, असे यातील जाणकार सांगतात. अशा वेळी प्रगत लागवड तंत्राला योग्य नियोजनाची जोड देणे देखील गरजेचे आहे. हळद लागवड ते काढणी आणि प्रक्रिया हे कष्टाचे आणि खर्चीक काम असून, राज्याच्या बहुतांश भागात ते मजुराकरवीच करतात. या कामांत यांत्रिकीकरणाचा वापर वाढला पाहिजे. .काही प्रगत देशांनी कच्च्या हळदीवरच प्रक्रिया करता येतील अशा जाती आणि तंत्र विकसित केले आहे. अशा जाती आणि तंत्र देशातील, राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध व्हायला हव्यात. राज्यात सांगली, साताऱ्यापाठोपाठ वसमत, नांदेड, हिंगोली ह्या हळदीसाठी बऱ्यापैकी बाजारपेठा विकसित झाल्या आहेत. परंतु बुलडाणा, यवतमाळ, अकोला, वर्धा या विदर्भातील जिल्ह्यांतही हळदीचे क्षेत्र अधिक असताना त्या बाजारपेठा मात्र फारशा विकसित झाल्या नाहीत. औषध, अन्न प्रक्रिया, मसाले, सौंदर्य प्रसाधने आदी उद्योगांकडूनही हळदीला मागणी आहे. .परंतु उत्पादक शेतकऱ्यांच्या पातळीवर फारशी प्रक्रिया होत नाही. उत्पादकांच्या पुढाकारातून हळदीच्या हळकुंडापासून ते क्रीम्स, खाद्यान्ने व औषधांपर्यंतच्या मूल्यसाखळ्या तयार होणे गरजेच्या आहेत. हळदीचे मूल्यवर्धन करून उत्पादनांची निर्यात वाढवावी लागेल. भारतीय हळदीचा ब्रॅंड जगात लोकप्रिय असताना आपली हळद आणि मूल्यवर्धित उत्पादने जगभर पोहोचली तर हळद हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी पिवळे सोने ठरू शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.