Indian Agriculture: वाशीम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालेल्या चिया सीडला प्रति क्विंटल २२ हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे. विदर्भात प्रामुख्याने वाशीम, बुलडाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत मागील तीन वर्षांपासून चिया सीडची लागवड वाढत आहे. या भागातील शेतकऱ्यांना चिया सीडचे सरासरी एकरी उत्पादन तीन ते पाच क्विंटल मिळत आहे, तर १४ ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. .सध्याचा उच्चांकी दर हा हंगामाच्या सुरुवातीचा आहे. चिया सीड चार महिने कालावधीचे रब्बी हंगामातील पीक आहे. या पिकास पाणी कमी लागते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव या पिकावर कमीच दिसून येतो. वन्यप्राणी या पिकाला खात नाहीत, किंवा त्याचे नुकसानही करीत नाहीत. कमी पाणी, कमी खर्च, कमी देखभालीत हे पीक सध्या तरी बऱ्यापैकी उत्पन्न देत आहे..महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना आधी निमज, मध्य प्रदेश येथील मंडीतच चिया सीड विकावे लागत होते. आता स्थानिक बाजार समित्यांनी चिया सीडची खरेदी सुरू केली आहे. काही कंपन्या करार करून सेंद्रिय पद्धतीने उत्पादित चिया सीडची शेतकऱ्यांकडून खरेदी (बाय-बॅक) देखील करतात. यावर्षी संपूर्ण विदर्भात १० हजार हेक्टर चिया सीड लागवडीचे नियोजित असताना तेवढी लागवड एकट्या वाशीम जिल्ह्यातच झाल्याचे कळते..Chia Seed Farming: हरभऱ्याला पर्याय चिया सीड्स !.अलीकडे आपण पाहतोय लोकांची जीवनशैली तसेच आहारात सुद्धा मोठा बदल झाला आहे. आरोग्यवर्धक खाण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. त्यामुळे रोस्टेड जवस, चियासीड, मगज बीज (पमकीन सीड) अशा आरोग्यवर्धक, पौष्टिक पदार्थांना बाजारातून मागणी वाढत आहे. चिया सीडमध्ये तर अनेक औषधी गुणधर्म आहेत. यांत प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अमिनो आम्लेही भरपूर आहेत..चिया सीड हे हृदयासंबंधित आजार, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करणे, कर्करोग, पचन क्रियेचे आजार अशा विविध आजारांवर उपयोगी ठरत आहे. त्यामुळे याला लोक ‘सुपरफूड’ म्हणून देखील संबोधत आहेत. असे असले तरी सफेद मुसळी, गवार गम आदी अनेक नव्या पिकांचे प्रयोग राज्यात फसले आहेत..Chia Seed Farming: चिया सीड दहा हजार हेक्टरचा टप्पा गाठणार.लागवड कमी असताना उत्पादनही मर्यादित असते, तेव्हा अशा नव्या पिकांना दर चांगला मिळतो. त्यांनंतर लागवड आणि उत्पादन वाढले, की दर तर कोसळतातच मात्र त्यास कोणी घ्यायला सुद्धा तयार राहत नाही आणि शेतकरी अडचणीत येतो. अशा वेळी बाय-बॅक करणाऱ्या कंपन्या देखील अंग काढून घेतात. तसे चिया सीडचे होणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल..चिया सीडमध्ये क्षेत्र विस्ताराबरोबर बाजार क्षमताही चांगली आहे. चिया सीडची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केल्यास सध्याच्या सरासरी उत्पादनात दीड-दोन पटीने वाढ होऊ शकते. त्याकरिता कृषी विद्यापीठांनी याचे शास्त्रशुद्ध लागवड तंत्र शेतकऱ्यांना द्यायला हवे. चिया सीडची लागवड आणि उत्पादन वाढत असताना यांस ‘लोकल ते ग्लोबल’ मार्केट कसे उपलब्ध होईल हे कृषी तसेच पणन विभागाने पाहायला हवे..बाजारातून चिया सीडची मागणी वाढण्यासाठी लोकांमध्ये याची पौष्टिकता तसेच आरोग्यदायी फायद्यांबाबत जाणीव जागृती निर्माण करावी लागेल. आइस्क्रीम, ज्यूसपासून ते अनेक प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थात चिया सीड वापरले जाते. अशावेळी चिया सीडवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थानिक पातळीवर उभे राहायला हवेत. असे झाले तरच चिया सीडला मागणी टिकून राहील, दरही चांगला मिळेल, शिवाय स्थानिक पातळीवर प्रक्रियेचा फायदा उत्पादक तसेच रोजगाराच्या रूपाने तरुणांना मिळेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.