October Heat And Its Impact On Agriculture: मतचोरी विरोधातील आंदोलनाने दिल्लीचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. राज्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबविले असले तरी त्यांच्या मनात असंतोषाची धग कायम आहे. अशा या गरमागरमीच्या वातावरणात सूर्यदेवही मागे नाही. राज्यात यावर्षी ऑक्टोबर हिटचे चटके सप्टेंबरपासूनच सुरु झाले होते. आता ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर ही होरपळ चांगलीच वाढली आहे. .कोकणात रत्नागिरी तर विदर्भातील अमरावतीमध्ये तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर गेला आहे. उर्वरित महाराष्ट्रातही ३६ अंश सेल्सिअसच्या वर तापमान आहे. तीव्र उन्हासह उकाडाही वाढल्याने नागरिक हैरान आहेत. आरोग्याच्या अनेक समस्याही डोके वर काढत आहेत. पुढे उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता काय असू शकते, याची जणू झलकच सध्या ऑक्टोबर हिट दाखवत आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. यावर्षी एल निनोच्या प्रभावाने झालेल्या कमी पाऊसमानामुळे खरीप हातचा गेला तर रब्बीवर भयंकर अनिश्चिततेचे सावट आहे..Climate Change: प्रशांत महासागराच्या तापमानात सरासरीपेक्षा ४ अंशांनी वाढ.अशा वेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगारनिर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुपालनासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. राज्यात कमी पाऊसमानाचा अंदाज पावसाळ्यापूर्वीच वर्तविण्यात आला होता. तेव्हापासून रोजगार, जनावरांचे चारा-पाणी, पिण्याचे तसेच शेतीसाठी पाणी याचे नियोजन करणे गरजेचे होते. आता वेळ निघून गेल्यावर काय सूक्ष्म नियोजन करणार, हा खरा प्रश्न आहे..राज्यात ऑक्टोबर हा संक्रमणाचा महिना असतो. मॉन्सून परतत असताना जर रेंगाळला तर ऑक्टोबरचे तापमान जरा कमी राहते. परंतु मॉन्सून लवकर परतला तर ऑक्टोबरमध्ये तापमान वाढते. यालाच ऑक्टोबर हिट म्हणतात. यावर्षी मॉन्सून कधी परतला याची जाणीव देखील झाली नाही. त्यात एकंदरीतच कमी पाऊसमान आणि मॉन्सूननंतरही एल निनोचा वाढता प्रभाव असल्याने तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. रब्बी पीक पेरणीसाठी जमिनीत ओल नाही आणि शेतकऱ्यांच्या हाती छदाम देखील नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे..नदी-नाले तर आधीच आटलेलेच आहेत. आता जे काही पाणीसाठे आहेत, त्यातील पाण्याचे बाष्पीभवन वाढून तेही आटू लागतील. विजेचा लपंडाव, भारनियमन राज्यात सुरुच आहे. त्यामुळे थोडेफार पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी देखील रब्बीसाठी सिंचनास अडचणी येत आहेत. पाण्याच्या उपलब्धतेबरोबर थंडी कशी राहील, यावरही रब्बी कसा येणार, हे ठरते. कडाक्याची थंडी ही गहू, हरभऱ्यासह इतरही पिकांना पोषक असते. परंतु यंदा थंडी देखील कमीच राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अर्थात सर्वच बाजूंनी रब्बीची कोंडी!.Climate Change Crisis: हवामान संकट अन् कृषी-अर्थव्यवस्था.यंदा पाऊसमान कमी असताना जून-जुलैमध्ये गावोगाव वाहणारे ओढे-नाले छोटे छोटे बंधारे घालून अडविले असते तर रब्बी हंगामात एक-दोन संरक्षित सिंचनाची सोय झाली असती. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची देखील काही दिवस सोय झाली असती. हे काम रोजगार हमी योजनेतून केली असती तर गावातच रोजगार निर्मिती देखील झाली असती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या करायच्या की पशुपालकांना थेट अनुदान द्यायचे, यावर सरकार दरबारी विचार सुरु आहे..चारा निर्मितीसाठी तीन ते चार महिने लागतात. त्यामुळे दुष्काळ पडल्यावर नाही तर दुष्काळाची चाहूल लागताच चारा नियोजन करणे गरजेचे होते, ते झाले नाही. दुष्काळी भागासाठी बाहेरून पाणी आणण्याचे आश्वासने दिली जातात परंतु आहेत त्या धरणांतील पाणी वापराबाबत कोणतेही नियोजन होत नाही, हे राज्यात सातत्याने सुरु आहे. दुष्काळी भागाचे वाळवंटीकरण होत असताना राज्यकर्त्यांकडून जलमय महाराष्ट्राचे स्वप्नरंजन सुरु आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.