Agri Market Reform: फळे-भाजीपाला निर्यातीकरिता ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगाव येथे सर्वोपयोगी मल्टी मोडल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी सुमारे सात हेक्टर जागा राज्य कृषी पणन महामंडळाला विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. फळे-भाजीपाल्यासाठी काढणीपश्चात पुरेशा प्रमाणात सेवासुविधा नसल्यामुळे ३० ते ३५ टक्के शेतीमाल वाया जातो. करोडो रुपयांचे शेतकऱ्यांचे हे थेट नुकसान आहे. .अशावेळी ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल अशा टर्मिनल मार्केटमध्ये येऊन तेथून तो निर्यात होत असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. यामुळे शेतीमालाचे काढणीपश्चात नुकसान टळून त्यास अधिक दर मिळू शकतो.शेतीमाल निर्यातवृद्धीने देशाला अधिकचे परकीय चलनही मिळू शकते. परंतु टर्मिनल मार्केटची ही संकल्पना काही नवीन नाही. मुंबई, नागपूर तसेच नाशिकमध्ये अशा प्रकारचे टर्मिनल मार्केट उभारण्याची घोषणा यापूर्वी झाली आहे..National Agri Market: आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी बाजारपेठ उभारणार.त्यात मुंबई तसेच नागपूर येथील टर्मिनल मार्केटसाठी जागा देखील उपलब्ध आहे. परंतु जागा उपलब्धतेच्या पुढे प्रकल्प हालताना दिसत नाहीत. अशा वेळी ठाणे येथील टर्मिनल मार्केट तत्काळ मार्गी लागावे आणि त्यातील सेवासुविधा शेतकरी, व्यापारी, निर्यातदार यांना उपलब्ध व्हाव्यात, एवढीच अपेक्षा!.युरोप, अमेरिका या देशांतील टर्मिनल मार्केटच्या संकल्पनेत कचरामुक्त (गारबेज फ्री) उदा. फुलकोबीची पाने काढून, कोंबडी ड्रेसिंग करून आणली जाते. टर्मिनल मार्केटमध्ये त्याची वर्गवारी, प्रतवारी, गरजेनुसार त्यावर प्रक्रिया, पॅकिंग करून हा शेतीमाल देश-विदेशांतील बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. टाकाऊ शेतीमालासह इतर कचरा शहरांत होऊ नये, शहरांच्या प्रदूषणात वाढू होऊ नये, हा त्यामागील उद्देश!.Agri Reforms: खत विक्री प्रणाली ‘अॅग्रीस्टॅक’ला जोडणार.आपल्या देशात प्रामुख्याने शेतीमाल वर्गवारी, प्रतवारी, प्राथमिक प्रक्रिया करून सहसा कोणीही आणत नाही. त्यामुळे टर्मिनल मार्केटमध्ये असा कचरामुक्त माल आणण्यासाठी शहरांच्या बाहेर शेतीमाल गोळा करून तो स्वच्छ करण्यासाठी सेंटर्स उभारावे लागतील. त्यासाठी पण जागा लागणार आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे..मुंबई (वाशी) बाजार समितीत महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतून शेतीमाल येतो. हा शेतीमाल मुंबईसह देशविदेशांत पाठविला जात असल्याने त्यास आंतरराष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू आहेत.त्यानंतर फ्रान्समधील पॅरिसजवळील रुंजीस आंतरराष्ट्रीय बाजाराच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यात महामुंबई आंतराष्ट्रीय बाजार साकारण्याची घोषणा देखील यापूर्वी झाली. त्याकरिता दोन हजार एकर जागेची चाचपणी सुरू आहे..शिवाय केंद्र - राज्य सरकारच्या वतीने पालघरजवळच वाढवण बंदर विकासाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यात आता हे चवथे टर्मिनल मार्केट ठाणे, पालघर परिसरातच विकसित होत आहे. या चारही प्रकल्पांचा हेतू शेतीमालास काढणीपश्चात सर्व सेवासुविधा उपलब्ध करून निर्यातवृद्धी साधणे असा जवळपास सारखाच आहे. अशावेळी या चारही प्रकल्पांना पुरेसा शेतीमाल मिळेल का, हा प्रश्न उपस्थित होतो..तसे झाले नाही तर कमी क्षमतेने चालणारे हे प्रकल्प पुढे व्यवहार्य ठरणार नाहीत, यावरही विचार व्हायला हवा. देशात आंतरराष्ट्रीय बाजार अथवा टर्मिनल मार्केटच्या धर्तीवरच बंगळूर येथे ‘सफल’ मार्केट सुरू करण्यात आले होते.परंतु ते फार काळ चालले नाहीत. राज्यात महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार असो की मल्टी मोडल हब अथवा टर्मिनल मार्केट असो, त्यांची उभारणी करताना ‘सफल’ का असफल झाले, याचाही अभ्यास व्हायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.