Agriculture Loss: केसर असो की हापूस, आंबा उत्पादनातील घट काही या वर्षीची नाही. मागील दशकभरापासून हवामान बदलाचा फटका हापूस आणि केसर आंब्याला बसत आहे. .अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आमरस - पुरीचा नैवेद्य कुलदेवतेसह पितरांना दाखविण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या वर्षी मात्र अक्षय तृतीयेला आमरसासाठी आंबा खरेदी करताना ग्राहकांना थोडे अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्याचे कारण म्हणजे हापूस, केसरचे घटते उत्पादन, कमी आवक, वाढती मागणी आणि पर्यायाने वाढलेले दर हे आहे..Mango Fruit Drop Issue: तापमानवाढीमुळे आंबा फळगळ वाढली.सर्वसाधारणपणे ६०० ते ८०० रुपये डझन मिळणारा हापूस सध्या हजार ते १८०० रुपयांवर पोहोचला आहे. ६० ते ७० रुपये प्रति किलोने मिळणाऱ्या केसरचे दर १६० ते २०० रुपये किलोवर गेले आहेत. ग्राहकांना हा महागाईचा थोडा फटका असला, तरी उत्पादक शेतकरी मात्र याची फार मोठी किंमत मोजत आहेत. हवामान बदलामुळे या वर्षी हापूस आंबा उत्पादनात ७० टक्क्यांपर्यंत घटीची शक्यता वर्तविली आहे. .केसर आंबा उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार केसर आंबा उत्पादन घटीचे प्रमाण विभागानुसार २५ ते ७५ टक्क्यांपर्यंत आहे. केसर असो की हापूस आंबा उत्पादनातील ही घट काही या वर्षीची नाही. मागील दशकभरापासून हवामान बदलाचा फटका हापूस आणि केसर आंब्याला बसून उत्पादनात मोठी घट आढळून येत आहे. आंब्याबरोबर कोकणातील नारळ, सुपारीच्या बागा, मसाला पिके तसेच येथील मासेमारी देखील बदलत्या हवामानात धोक्यात आली आहे..Rain Mango Damage: पूर्वमोसमीचा तडाखा; आंब्यासह भाज्या मातीमोल.नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीत सरकारच्या पारंपरिक भरपाईच्या निकषाप्रमाणे हेक्टरी अवघे १७ हजार रुपये मिळतात. ही भरपाई फारच तुटपुंजी ठरत आहे. शेतकऱ्यांची मागणी राष्ट्रीय आपत्ती निवारणातून हेक्टरी तीन ते पाच लाख रुपयांची आहे. परंतु त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने सिंधुदुर्गच्या मुख्यालयावर हजारो आंबा आणि काजू बागायतदारांनी मार्चमध्ये ‘आक्रोश मोर्चा’ काढला होता. त्यानंतर हेक्टरी २२ हजारांची तुटपुंजी अशी मदत जाहीर करीत शेतकऱ्यांची एकप्रकारे बोळवण करण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंबा, काजू उत्पादकांचा धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू यांनी दिला आहे. या मोर्चास विरोधी पक्षांनी पाठिंबा देण्याचे आवाहन देखील शेट्टी यांनी केले आहे..कोकण असो की उर्वरित महाराष्ट्र, कृषी क्षेत्राबाबत आतापर्यंतचे संशोधन वातावरणातील समतोल गृहित धरून झाले. आता मात्र आंब्यासह इतरही बागा वातावरणातील हे बदल सहन करू शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बदलत्या हवामानास पूरक संशोधनावर भर द्यावी लागेल. हवामान बदलाचा कहर सुरू असताना बनावट निविष्ठांमुळे आंब्यासह इतरही सर्व पिकांचे नुकसान वाढत आहे. याबाबत कृषी विभागाने सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची शेतकऱ्यांची मागणीही रास्तच म्हणाली लागेल..कोकणचा हापूस आणि मराठवाड्यातील केसर यांना जीआय मानांकन आहे. परंतु या दोन्ही जातींचे मूळ स्थानांबरोबर इतरत्रही कमी-अधिक गुणवत्तेत उत्पादन होते. त्यामुळे मूळ स्थानच्या आंब्यावर अन्याय होत असल्याची भावना उत्पादकांची आहे. जीआयचा मुख्य उद्देश बाजारातील भेसळीवर आळा घालण्याबरोबर क्वालिटी टॅगद्वारे संबंधित शेतीमालास अधिक दर मिळवून देणे हा आहे. त्यामुळे विभागनिहाय हापूस तसेच केसरला जीआय मिळाला तर त्यांचे उत्पादक आपापल्या ब्रॅण्डच्या नावाने बाजारात आंबे विकतील. प्रश्न केवळ एका हंगामातील नुकसानीचा नसून वाढत्या नैसर्गिक आपत्तीने एकंदरीतच शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार व्हायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.