Healthy eating tips for school children: चटपटीत व पौष्टिक मूल्य कमी असलेल्या अन्नपदार्थांच्या (जंक फूडच्या) आक्रमक जाहिरातबाजीचा देशातील ६७.६ टक्के किशोरवयीन मुलांच्या अन्ननिवडीवर मोठा प्रभाव पडत असल्याचे वास्तव ‘लेट्स फिक्स अवर फूड’ या अहवालातून पुढे आले आहे.देशात मुळातच किशोरवयीन (५ ते १९ वयोगट) मुलांची संख्या सुमारे २५ टक्के आहे. त्यापैकी ६७ टक्क्यांहून अधिक मुले जाहिरातीच्या प्रभावाने आरोग्यास हानिकारक जंक फूडकडे वळत असतील तर ही बाब गंभीर म्हणावी लागेल. ‘खाण्यासाठी जन्म आपला’ हा मराठीतील लोकप्रिय वाक्प्रचार आहे. .जीवनात खाण्याचा आनंद घेतलाच पाहिजे. वेगवेगळे पदार्थ चाखले पाहिजे, परंतु आपण काय खात आहोत, त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, त्याची माहिती असणे गरजेची झाली आहे. आज समाजात आजूबाजूला वजनदार मुलांची संख्या इतकी वाढली आहे, की डॉक्टरांकडे येणारी ६० टक्के मुलं लठ्ठपणा आजाराने त्रस्त आहेत..पैसा, प्रतिष्ठा, सुबत्ता सर्वकाही आहे पण चुकीच्या आहारपद्धतीमुळे जंक फूडच्या अतिसेवनाने लहान वयातच ह्रदयरोग, रक्तदाब, मधुमेह, कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. जंक फूडची सवय केवळ लठ्ठपणा तसेच रक्तदाब, मधुमेहापुरती मर्यादित नसून मुलांच्या मानसिक आणि वर्तनात्मक विकासावरही परिणाम करत असल्याचे वैद्यकीय निरीक्षणातून पुढे आले आहे. जंक फूडच्या सवयीने मुलांबरोबर आता सर्वच वयोगटातील महिला-पुरुषांनाही विळखा घातला आहे..Gouda Cheese History: झान्से स्कान्स ते गौडा चीज : कृषी पर्यटन, मूल्यवर्धनाचा प्रवास.विविध प्रकारचे वेफर्स, चिप्स, इन्स्टंट न्यूडल्स एवढेच नव्हे तर पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट, बेकरी पदार्थ, फोझन फूड आणि इतर अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ आता शहरी तसेच ग्रामीण भागात सुद्धा अगदी सहज उपलब्ध होत आहेत. त्यांचे आकर्षक छोटे पॅकींग, स्वस्त आणि खायला मस्त शिवाय टीव्ही, वर्तमानपत्रे याबरोबर समाज माध्यमांमध्ये वारंवार दिसणाऱ्या जाहिराती यामुळे मुलांसह सर्वांचाच कल या जंक फूडकडे वाढला आहे..काही शीतपेये हे मुलांसाठी वर्ज्य आहेत, तरीही ती शाळेय कॅंटीनसह जवळील परिसरात सहज मिळतात. काही जंक फूडवर पोषणमूल्याबाबतची माहिती असते. परंतु ती अत्यंत गुंतागुंतीची आणि वाचता येणार नाही, एवढ्या लहान स्वरूपात असते.त्यामुळे त्याकडे कुणाचे लक्ष जात नाही. जंक फूडमध्ये कार्बोहायड्रेट असते, फायबरचे प्रमाण नगण्य असते. अशा स्थितीत रक्ताभिसरणात कार्बोहायड्रेट्स ग्लुकोजच्या स्वरूपात बाहेर पडतात व परिणामी रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते..Sahyadri Jamun Honey: संशोधनाने वाढेल मधाचा गोडवा .तसेच इन्शुलिन वाढते आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्यही बिघडू शकते. एखाद्या जाहिरातीमध्ये अवास्तव अथवा चुकीचा दावा केला तर ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल करून कारवाई करता येते. जंक फूडच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते लहान मुलांसह सर्वांच्याच आरोग्याशी खेळत आहेत. अशा वेळी त्यांच्या जाहिरातीवर बंदी घातली पाहिजे. ब्रिटनसह अनेक प्रगत देशांनी जंक फूडच्या जाहिरातीवर मर्यादा आणल्या आहेत..तसेच नियम भारतातही उपयुक्त ठरतील. यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. आरोग्यदायी आहाराची माहिती विद्यार्थ्यांना दिल्यास सुमारे ४४ टक्के विद्यार्थी जंक फूड टाळू शकतात, असे ‘लेट्स फिक्स अवर फूड’ हा अहवाल सांगतो. त्यामुळे आरोग्यदायी आहाराबाबत व्यापक जनजागृती (खासकरून मुलांमध्ये) देखील झाली पाहिजे. शाळा परिसरात आरोग्यास हानिकारक जंक फूड विक्रीवर बंदी असायला हवी..त्याऐवजी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नाचे पर्याय स्वस्तात उपलब्ध करून द्यायला हवेत. ‘जेव्हा घरातलं किचन सर्वांचं होतं, तेव्हा जंक फूड घरातून पळ काढतं’ ही चिनी म्हण आहे. अशावेळी मुलांना त्यांच्या आवडीचा वेगळा पदार्थ तयार करायला प्रोत्साहित करायला हवे. त्यांनी केलेले नवीन पदार्थ चवीनं खात त्याचं कौतुक करा. विश्वास ठेवा, मग मुलं स्वत:हूनच जंक फूडच्या वाट्याला जाणार नाहीत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.