तापमानवाढीची कारणे स्पष्ट आहेत, गरज आहे ती गरीब-श्रीमंत, लहान-मोठे देश हा भेद विसरून एकत्र येऊन उपाययोजना करण्याची!Environmental Issues: जर्मनीतील ‘पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च’सह विविध देशांतील संशोधकांनी तापमानवाढीचा वेग चिंताजनक पातळीवर पोहोचला असल्याचे मत व्यक्त केले आहे.संशोधकांच्या अभ्यासातून गेल्या दशकात तापमानवाढीचा वेग इतिहासातील कोणत्याही कालखंडापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे पुढे आले आहे. कालच (२३ मार्च) जागतिक हवामान दिन सर्वत्र साजरा करण्यात आला..या वर्षाच्या जागतिक हवामान दिनाची संकल्प घोषणा आहे - ‘आजचे निरीक्षण, उद्याचे संरक्षण!’ परंतु मागील दोन दशकांपासून जागतिक पातळीवर हवामान बदलाबाबत काम करणाऱ्या संस्था, शास्त्रज्ञ यांच्या गंभीर इशाऱ्यांकडे सर्वच देश सोईस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहेत.२०२४ हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी मानव जातीच्या हातामध्ये फक्त दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्र संघाने जगाला दिला होता..Climate Change: हवामान बदलाचे वाढते संकट आणि उपायांची गरज.या इशाऱ्याच्या वर्षभरानंतर पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्राने हवामान बदल विरोधातील लढ्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन जगाला केले होते. जग एकत्र येणे तर दूरच मात्र ज्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाने कर्ब उत्सर्जन वाढून तापमानवाढीस हातभार लागतो, त्यासाठी युद्ध सुरु आहे..वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसत आहे. हवामान बदलाच्या मुळाशी देखील तापमानवाढ आहे. हवामान बदलाच्या काळात नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. या काळात पीक उत्पादन खर्च वाढून शेतपिकांचे नुकसान वाढले.हे नुकसान जगाची अन्नसुरक्षा धोक्यात येईपर्यंत इतके वाढले आहे. एवढेच नव्हे तर मानवी आरोग्याबरोबर जैवविविधतेचा ऱ्हास होतोय, पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून संपूर्ण सजीव सृष्टीसाठी ही बाब धोकादायक आहे..Climate Change Impact: गव्हाला बसतोय हवामान बदलाचा फटका.परंतु याबाबत कोणालाच गंभीरता दिसत नाही. त्यामुळे कर्ब वायू संहती (कॉन्संट्रेशन) वाढत चालली आहे. १९९२ ला ३०० पीपीएम (पार्टसपर मिलियन) असलेली कर्ब संहतीची कमाल मर्यादा सध्या ४२९ पीपीएम च्या पुढे गेली आहे. या गतीने कर्ब उत्सर्जन वाढत गेल्यास २०५० ला ते प्रमाण ५५० पीपीएम होऊ शकते..त्यावेळी जगाचे तापमान ३ अंश ते ५ अंश सेल्सिअसने वाढेल. परंतु, जगाची तापमान वाढ २ अंश सेल्सिअसवर रोखली पाहिजे, यावर १९९२ पासून सर्व देशांचे एकमत आहे. पॅरिस कराराने तर १.५ अंश सेल्सिअस सुरक्षित मर्यादा निश्चित केली आहे. त्यासाठी प्रयत्न मात्र कोणीच करीत नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल..Climate Change Impact: पुन्हा ढगाळ वातावरण, शेतकऱ्यांना धसका.विकसनशील देशांनी २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी त्या दिशेने त्यांचे प्रयत्न दिसत नाहीत. तापमानवाढ रोखण्यासाठी प्रत्येक देश छोट्या-छोट्या उपाय योजना करीत आहेत.परंतु त्याचे अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. त्याऐवजी सर्व देशांनी मिळून जागतिक पातळीवर कायमस्वरूपी उपायांचा कृती आराखडा तयार झाला पाहिजेत. हे करीत असताना हवामान बदलास कोण किती जबाबदार हा वाद निर्माण होता कामा नये..तापमान वाढीची कारणे स्पष्ट आहेत, गरज आहे ती गरीब-श्रीमंत, लहान-मोठे देश हा भेद विसरून एकत्र येऊन उपाययोजना करण्याची! हे आत्ता केले नाही तर विनाशापासून आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. आपल्या देशाच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास कार्बन उत्सर्जन कमी करून हळूहळू सौर, पवन, जल अशा अक्षय ऊर्जेकडे वळावे लागेल..तेलांवरील वाहनांऐवजी अपारंपरिक आणि स्वच्छ इंधनावरील वाहने आणावी लागतील. जिथे शक्य आहे तिथे वृक्ष लागवड, संवर्धन अशा मोहिमा आखून त्या यशस्वी कराव्या लागतील. शेतकऱ्यांनी हवामान बदलास पूरक पीकपद्धतीबरोबर एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करायला हवा. असे केले तरच भविष्यात तापमानवाढीच्या झळा कमी होतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.