Digital Weather Station for Farmers: भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुण्यात देशातील पहिले पूर्णतः डिजिटल हवामान निरीक्षण केंद्र सुरू केले आहे. डिजिटल हवामान केंद्रामुळे हवामानाचा अचूक आणि वेळेवर अंदाज मिळणार असून, याचा सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना होणार, असा विश्वास हवामानशास्त्र विभाग पुण्याचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. सी. साईकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. हवामान हा घटक केवळ मानवी जीवनापुरता मर्यादित नसून तो प्राणी, पक्षी, वनस्पती आणि संपूर्ण परिसंस्थेवर परिणाम करणारा आहे. सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा, पर्जन्य या घटकांतील बदलामुळे हवामानात सातत्याने विविधता दिसून येते. .मात्र गेल्या काही दशकांत मानवनिर्मित कारणांमुळे हवामानातील बदलांची गती वाढली आहे. वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान आणि तीव्र होत चाललेले हवामान बदल हे शेती व मानवी जीवनासमोरील सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. हवामान बदलाच्या काळात वाढत्या नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका हा शेती क्षेत्राला बसत आहे. नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचे काम करीत आहेत. अशा वेळी डिजिटल हवामान केंद्राने अचूक अन् वेळेवर अंदाज शेतकऱ्यांना मिळाला तर शेतीतील जोखीम कमी होऊन त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार, यात शंका नाही..Digital Weather Center: देशातील पहिले डिजिटल हवामान केंद्र पुण्यात सुरू.डॉप्लर रडार, उपग्रह प्रणाली आणि स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे सध्या हवामान अंदाज वर्तविला जातो. देशातील विविध भागांमध्ये असलेल्या सुमारे ५०० हवामान केंद्रांवर दर तीन तासांनी मॅन्युअल पद्धतीने हवामानाच्या नोंदी घेतल्या जातात. या नोंदी संबंधित केंद्रांकडून हवामान विभागाकडे पाठविल्यानंतर त्यावर संशोधन केले जाते आणि त्याआधारे हवामानाचा अंदाज नागरिकांना दिला जातो. मात्र मॅन्युअल नोंदी करताना मानवी चुका होतात. त्यामुळे हवामान अंदाजाच्या अचूकतेवर परिणाम होत होता..ही अडचण दूर करण्यासाठी देशातील ५०० हवामान केंद्रे पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने डिजिटल करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. त्याचीच ही सुरुवात आहे. डिजिटल हवामान केंद्रात तपशीलवार माहिती दर मिनिटाला मिळणार आहे. माहितीची स्वयंचलित तपासणी, चुकीची माहिती ओळखण्याची क्षमता यामध्ये असणार आहे. माहिती थेट प्रणालीमध्ये जमा होणार असल्याने डेटा अधिक वेगाने उपलब्ध होण्यास हातभार लागेल..Digital Weather Station: देशातील ५०० हवामान केंद्रे होणार डिजिटल.जागतिक तसेच स्थानिक घटकांचा देखील हवामानावर प्रभाव पडतो. डिजिटल हवामान केंद्रांद्वारे स्थानिक स्तरावरील हवामान माहिती अधिक तपशीलवार उपलब्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे हे स्वदेशी तंत्रज्ञान असल्याने याचा विस्तार जलद होऊ शकतो. त्यामुळे आता देशातील उर्वरित हवामान केंद्रे देखील डिजिटल करण्याचे काम वेगाने व्हायला हवे..हवामान सेवा केवळ अंदाज देण्यापुरती मर्यादित नसून ती आपत्ती व्यवस्थापनासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. अतिवृष्टी, चक्रीवादळे, उष्णतेच्या लाटा किंवा थंडीच्या लाटांबाबत आधीच सूचना दिल्यास मानवी जीवितहानी आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते..केंद्र सरकारच्या विंड्स (हवामान माहिती नेटवर्क डाटा सेंटर) प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय आधीच झाला आहे. गावपातळीवर स्वयंचलित हवामान केंद्रे उभे राहून त्यास डिजिटल यंत्रणेची जोड मिळाल्यास गावपातळीवर हवामानाचे अचूक अंदाज मिळतील. हे अंदाज गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तत्काळ पोहोचविणारी यंत्रणा देखील उभी करावी लागेल. असे झाले तरच बदलत्या हवामान काळात शेती टिकेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.