तृणधान्य पिकांचे दहा वाण विकसित

शेतीला पाण्याची किती गरज आहे, याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी विद्यापीठात अत्याधुनिक स्वयंचलित ठिंबक सिंचन यंत्रणा, स्वयंचलित हवामान केंद्र प्रकल्प राबवला जात आहे. याशिवाय विद्यापीठ कार्यक्षेत्रातही ठिंबक सिंचनचा वापर करुन शेतकऱ्यांना पाणीबचतीचे धडे दिले जात आहेत.
Cereals
Cereals

देशात यंदा तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. त्यामुळे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वर्षभरात विविध तृणधान्य पिकांचे एकूण दहा वाण विकसित केले आहेत. राज्यातच नव्हे तर देशात देशी गायीच्या दुधाला मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांचा देशी गायींकडे ओढा वाढत आहे. त्यांना देशी गायींबद्दल शास्त्रोक्त माहिती मिळावी, यासाठी पुण्यातील कृषी महाविद्यालयात संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. पी. जी. पाटील यांनी याविषयी माहिती दिली.

तृणधान्य वर्षानिमित्त संशोधनाचे नियोजन काय आहे? - यंदाचे वर्ष देशात तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तृणधान्यांच्या उत्पादन वाढीसह नवीन वाण विकसित करण्यावर भर दिला. विविध तृणधान्य पिकांचे एकूण १० वाण गेल्या वर्षभरात विकसित केले. त्यामध्ये फुले यशोमती (ज्वारी), आदीशक्ती (बाजरी), फुले अनुपम (गहू), फुले गोल्ड (करडई), फुले किरण (करडई), पुर्णा (तीळ), फुले वसू (उडीद), फुले दुर्वा (सोयाबीन), फुले ११०८२ (ऊस) यांचा समावेश आहे.  वाण आहेत. याशिवाय वर्षभरात एक शेती औजार, दोन ताण सहन करणारे स्त्रोत आणि ५६ कृषी तंत्रज्ञान शिफारसी केल्या आहेत. पुरक व्यवसायासाठी कोणते विशेष उपक्रम हाती घेतले आहेत? - शेतीला पाण्याची किती गरज आहे, याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी विद्यापीठात अत्याधुनिक स्वयंचलित ठिंबक सिंचन यंत्रणा, स्वयंचलित हवामान केंद्र प्रकल्प राबवला जात आहे. याशिवाय विद्यापीठ कार्यक्षेत्रातही ठिंबक सिंचनचा वापर करुन शेतकऱ्यांना पाणीबचतीचे धडे दिले जात आहेत. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. बदलत्या वातावरणाचा संकरित गायींच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे आपण पाहतो. त्यामुळे देशी गायींचा पर्याय देण्यासाठी विद्यापीठाचा प्रयत्न आहे. देशी गायीच्या दुधाला मागणीही चांगली आहे. शेण, गोमुत्राचाही वापर वाढतोय. मात्र या व्यवसाताली बारकावे अजूनही शेतकऱ्यांना माहित नाहीत. राज्य शासनाने पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र मंजूर केलेले आहे. साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी या गायींचे प्रात्यक्षिक युनिट तिथे तयार केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये या गायींचे दूध उत्पादन, गोमय, गोमुत्र यांचा तुलनात्मक अभ्यास तिथे केला जाणार आहे. तसेच देशी गायींचे शास्त्रीयदृष्ट्या व जलद गतीने संवर्धन होण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये दुधासाठी देशी गोपालन करताना गायींची निवड, त्यांचे व्यवस्थापन, चारा उत्पादन, चारा प्रक्रिया, दूध व दुग्धजन्य पदार्थ, प्रक्रिया, शेण व गोमूत्र प्रक्रिया, तसेच बायोगॅस व सेंद्रिय खत निर्मिती इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव आहे. आतापर्यत दहा हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. येथेच देशी गाईंच्या सानिध्यातील पर्यटन केंद्र विकसित करण्याचेही नियोजन आहे. विद्यापीठ माॅडेल उभा करुन देईल, शेतकऱ्यांनी त्याचा पुरक व्यवसाय म्हणून विस्तार करायचा आहे.

 हे हि पहा : खानदेशात ४५ टक्के ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत शेतकरी आयडाॅल तसेच जीआयझेड सामंजस्य करार याबद्दल काय सांगाल? - कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण, संशोधन, इतर तांत्रिक माहिती यांचा उपयोग करून ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रयोग केले, चांगले उत्पन्न काढले ते शेतकरी इतरांसाठी आदर्श ठरतात. त्यांना आपण शेतकरी आयडॉल म्हणतो. त्यांच्या कामाची माहिती फलकाद्वारे प्रसारित करण्याचा उपक्रम सुरू केला. दर महिन्याला एका शेतकरी आयडॉलचा फलक विद्यापीठ प्रवेशद्वार, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचा दर्शनी भाग, विद्यार्थी वसतीगृहे, कार्यक्षेत्रातील कृषी महाविद्यालये, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे आदी ठिकाणी लावला जातो. कृषी विद्यापीठ व जीआयझेड जर्मनी यांच्यात तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी सांमजस्य करार झाला आहे. यातून ‘एनआयसीईएसएसएम’ या डिजिटल पटलाद्वारे नगर जिल्ह्यातील पारनेर व धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एकूण १३ गावांमध्ये कृषी सल्ला सेवा दिली जात आहे. त्यात १९ शास्त्रज्ञ कन्टेन्ट व्हॅलिडेटर, कृषी विज्ञान केंद्रांचे ९ विशेषज्ञ कन्टेन्ट निर्माते आणि संकेतस्थळ समन्वयक यांचा समावेश आहे. या प्रकल्पातून १९ हजार शेतकऱ्यांना दीड कोटी कृषी सेवा सल्ले दिले जाणार आहेत. ---- संपर्क ः प्रसारण केंद्र - डॉ. पंडीत खर्डे (८२७५०३३८२२), डॉ. सचिन सदाफळ (७५८८००५२९१)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com