Indian Agriculture: लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात संत्रा, मोसंबी, लिंबू या फळपिकांचा समावेश आहे. यातील संत्रा हे फळपीक विदर्भातील अमरावती नागपूर परिसरात, मोसंबी हे मराठवाड्यातील नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर तर लिंबू हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रुजलेलं फळपीक आहे. तर किन्नो हे पंजाबच्या मातीत रुजलेलं फळपिक. मागील दीड-दोन दशकांपासून हवामान बदलाचा फटका राज्यातील सर्वच फळपिकांना बसला आहे. मात्र यात सर्वाधिक नुकसान संत्रा, मोसंबी, लिंबू या फळपिकांचे झाले आहे. .अधिक दुर्दैवी बाब म्हणजे संशोधन, तंत्रज्ञान अवलंब या पातळ्यांवर ही फळपिके फारच दुर्लक्षित राहीली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशा वेळी लिंबूवर्गीय फळपिकांतील संशोधन, तंत्रज्ञान विकास, ज्ञान व माहितीचे आदान-प्रदान तसेच शेतकरी केंद्रित उपक्रमांना अधिक गती देण्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (सीसीआयआर) यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे..Agricultural Research: संशोधनाचा सांगावा!.संत्रा, मोसंबी, लिंबू या पिकांना १९९० पासून हादरे बसायला सुरवात झाली आहे. १९९० ते २००० हे दशक ‘कोळसी’ रोगाने गाजविले. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या बागा कमजोर झाल्या. त्यानंतर २००५ दरम्यान काटोल, नरखेड, वरुड परिसरात पाणीटंचाईच्या संकटाने संत्रा बागा तर जालना, संभाजीनगर जिल्ह्यात मोसंबी बागा मोठ्या प्रमाणात वाळल्या. त्यातून संत्रा, मोसंबी उत्पादक सावरतो न सावरतो तोच २००५ ते २०१० ही पाच-सहा वर्षे फायटोप्थोरा, डिंक्या रोगांमुळे मोठ्या प्रमाणात वाळलेल्या बागा शेतकऱ्यांना काढून टाकाव्या लागल्या. २०१२ पासून डबल लाइन ठिबक, पाण्याचा निचरा काढण्याची पद्धत, बागेचे उत्तम व्यवस्थापन तंत्राने चांगल्या बागा उभ्या राहत आहेत..मात्र याच वेळी बदलत्या हवामानाचा फटका संत्रा बागांना बसत आहे. तर मागील दशकभरापासून वाढत्या फळगळीने उत्पादक त्रस्त आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीपासून या मातीत रुजलेल्या संत्रा, मोसंबी, लिंबू फळपिकाला दर्जेदार, रोग-कीड प्रतिकारक खुंट मिळत नाही. भेसळयुक्त खुंटावर कलमीकरणातून उभ्या असलेल्या बागा रोग-किडींना मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. त्यावर प्रभावी उपाय शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था तसेच कृषी विद्यापीठांतर्गतच्या संशोधन संस्था प्रभावी उपाययोजना देऊ शकत नसल्याने त्यांच्यावर जोरदार टिका देखील होते..Citrus Research: लिंबूवर्गीय फळपिके संशोधनाला गती.केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांची संशोधन केंद्रे यांच्यामध्ये समन्वयाचा अभावाबाबत देखील वारंवार बोलले जाते आणि त्यात तथ्यही आहे. हा असमन्वय दूर करण्याचे काम सामंजस्य करारातून व्हायला हवे. सामंजस्य करारातून हवामान बदलाच्या स्थितीत शेतकऱ्यांना मोसंबी, संत्रा, लिंबू या फळपिकांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यास हा करार महत्त्वाचा असल्याचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी स्पष्ट केले आहे..हे साध्य होण्यासाठी बदलत्या हवामानानुसार बहर व्यवस्थापन यावर व्यापक संशोधन झाले पाहिजे. एवढेच नव्हे तर संत्रा, मोसंबी, लिंबू यामध्ये कीड-रोगमुक्त दर्जेदार खुंट उपलब्धतेपासून ते हवामान बदलात पूरक वाण संशोधन, फळांचे काढणीपश्चात व्यवस्थापन, निर्यात, प्रक्रिया यातील संधी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हायला हव्यात. मागील अनेक वर्षांपासून संशोधनाला गती नाही, या टीकेला उत्तर देण्याची संधी देखील दोन्ही संस्थांना असून त्या संधीचे त्यांनी सोन्यात रूपांतर करायला हवे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.