आपत्ती शिकविते नियोजन

राज्यात दूध व्यवसायाला आपत्तींचे ग्रहण लागले आहे. वर्षभरापूर्वी लाळ खुरकुत रोग, पुढे दुष्काळ, नंतर महापुराचा वेढा आणि आता कोरोना महामारी असा अडथळ्यांचा प्रवास चालूच आहे. पूर्वनियोजन, बचत, साठा आणि प्रबोधन यांची यशस्वी सांगड घालण्यासाठी दुग्ध व्यावसायिकांनी एकत्र येणं आणि सकारात्मक विचार करणं गरजेचे आहे. पशुपालकांना यातील बऱ्याच बाबी माहीत आहेत. मात्र, अनिच्छा आणि दुर्लक्ष पाठ सोडत नसल्याने आपत्ती मोठी होते.
agrowon editorial article
agrowon editorial article
Published on
Updated on

प्रभावी विस्तार शिक्षण यंत्रणा नसल्याने शाश्वत आणि आर्थिक फायद्याचे शास्त्रीय दूध उत्पादन तंत्र बहुअंशी पशुपालकांपर्यंत पोचतच नाही. दुग्ध व्यवसायासाठी संकरित गाय असो वा म्हैस, कोणत्या उत्पादन क्षमतेस फायद्याची ठरते याची समूह चर्चा होत नाही. पशुवैद्यक कामात दंग आणि दूधसंघ आकडेमोडीत गुंग यामुळे पशुपालकांपर्यंत ठोस माहिती पोचतच नाही. अनुभवातून राबवला जाणारा दूध व्यवसाय गोठ्यात पडताळणी करून सुधारणा सुचवणारी फळी विस्तार शिक्षणात गरजेची आहे. यातून गावचे दहा गोठे जरी आदर्श ठरले तरी बाकीचे त्याप्रमाणे अनुकरण करू शकतील. गोठ्यासाठी दर तीन महिन्यांचे चारा नियोजन महत्वाचे असते. चारा हाताशी असल्यास, व्यवसाय विना अडथळा सुरू राहतो. चारा नियोजनात चारा उत्पादन, साठवणूक आणि योग्य वापर यांची जोड देता येते. चाऱ्याचा विचार न केल्यास, दुग्ध व्यवसाय साफ कोसळतो. पुढच्या तीन महिन्यांचा चारा गोदामात लागतो तर चारा लागवड दर तीन महिन्यांस करावीच लागते.  चाऱ्याची शेती फायद्याची ठरते आणि आपत्ती काळात भरपूर मिळकतीची असते. नवनवीन चारापिके, ठिबक सिंचनावर चारा आणि चारा उत्पादन यातून पशुपालक व्यावसायिक विश्वास कमावतो. चाऱ्याला हायड्रोपोनिक्‍सची जोड, पर्यायी चारा पद्धती किंवा प्रक्रियायुक्त चारा यांची साथ गरजेचीच आहे. उसाचे पाचट, वाडे किंवा धान्याचे काड हे पर्याय सातत्याने पुढे येत आहेत.  पशुखाद्याचे वाढलेले दर आणि महाग झालेले पशुखाद्य घटक‌ परिणूर्ण पशुआहारात मोठा अडथळा ठरतात. मात्र , द्विदल चारा यातून पशुखाद्याचा एभाग किमान तीस टक्के कमी करता येणे शक्‍य आहे. पशुखाद्यात दूधप्रमाण व प्रत दडलेली असते. मात्र पर्यायांसह दूध प्रमाण वाढवण्याचे कौशल्य साध्य केल्यास पशुखाद्याचा खर्च सहज भागवता येतो. 

पाण्याचे नियोजन करूनच दूधव्यवसाय फायद्याचा ठरतो. उन्हाळ्यात नव्हे तर महापूरातही पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. मात्र वापरण्याचे पाणी पूर्ण कमी करणे आणि पिण्याचे पाणी कमी पडू न देणे, यासाठीचे नियोजन लागते. पाण्याला पर्याय नसतोच. मात्र, उपलब्ध पाण्याची नासाडी आणि शरीराची गरज कमी करता येते. उष्णतेचा ताण कमी करणारे उपाय प्रभावी ठरतात.  आपत्ती काळात पशुवैद्यक सेवा अहोरात्र सुरू असतात. मात्र, यंत्रणांचा संपर्कच नसल्याने पंचाईत होते. आपला पशुवैद्यक मित्र नसला तरी किमान माहित असावा आणि डझनभर फळी वेळप्रसंगी उपयोगी पडावी. कार्यालयीन टोल फ्री क्रमांक नोंद नसणे ही चूक ठरते. हरियाना सारकारने ‘टेलीमेडीसीन'' ची सुविधा देशात सर्वप्रथम नुकतीच सुरू केली आहे. अशी मागणी करण्यासाठी आपल्याकडे नेता, पुढारी, राजकारणी मिळत नाही, ही बाब दुर्दैवी नाही तर काय?  दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीचा विचार फायद्याचा ठरतो. आजार आणि अडथळे प्रकृतीस्वास्थ बिघडवतात आणि उत्पादन कमी करतात. जनावरे कौशल्यपूर्वक सांभाळताना संभाव्य आपत्तीचे परिमार्जन करण्याचे तंत्र समजावून घ्यावे असे प्रतिबंधात्मक उपाय यंत्रणेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून घेण्याची मागणी दूधदर आंदोलनापेक्षा कैकपट फायद्याची ठरते. 

भूकंप, वादळ, अतिवृष्‍टी, आग, महामारी, त्सुनामी, दुष्‍काळ, मंदी, युद्ध अशा अनेक संकटांचा सामना करताना सदैव सतर्क राहणे गरजेचे असते. जीवित पशुधन हानी पेक्षा उत्पादन खंड आणि प्रकृतीस्वास्थात अडथळे तोट्याचे ठरतात. नियोजनामुळै सर्व अडथळे विनाविलंब दूर करता येतात कारण आपत्ती नेहमी अल्पकाळ असते आणि सगळेच बेसावध असल्यामुळे सर्वांनाच भरडून टाकते. 

दैनंदिन दूधविक्री थांबली तर पर्याय उपलब्ध असावेत अन्यथा दूधसंघ घोर निराशा करतात. नाव सहकाराचं असलं तरी आपत्तीत घडणारे असहकार धोरण उत्पादकाला नुकसानीचे ठरते. दूधाचा इतरत्र वापर, वितरण, विनीयोग करता येणे शक्‍य असल्यास उत्पन्नात खंड० पडत नाही. हीच बाब शेणखत विक्री, गोऱ्हे विक्री, कळपातून काढून टाकलेल्या गायींची विक्री यांनाही लागू पडते.  पशुधनासाठी माज आणि प्रसूतीचे नियोजन केल्यास अडथळे समोर येत नाहीत. प्रत्येक जनावराचा माज घडवून आणणे आणि सुलभ प्रसूती पार पाडणे यासाठी नियोजन करता येते. मात्र आहार आणि सांभाळ योग्य असेल तरच पशुप्रजननाचे नियोजन करता येते, गायीकडून २० वेत तर म्हशींकडून १७ ते १८ वेत असे नियोजन केल्यास कमी वेतांची आपत्ती आणि तोट्याचे पशुपालन होत नाही. आपत्ती सर्वांनाच नको असते, मात्र निसर्ग / अपघात आपला धोका नेहमी घडवतात. विमा सुरक्षा कवच दूधव्यवसायास सहाय्य करते. पशुधन विमा योजना यशस्वी राबवली जाईल यासाठी पशुपालकांचा पुढाकार गरजेचा असतो. राज्यात डेअरी, शेळी-मेंढी, कुक्कुटपालन व्यवसाय विमा सुरक्षा योजनेतील असावेत. 

आपत्ती काळात सांभाळ, व्यवस्थापन यावर होणारा खर्च पशुपालनात कमी करावा लागतो. मुक्त संचार गोठा, मजूर खर्च शुन्यावर आणण्यात उपयुक्त ठरतो. धारा काढण्याचे काम मशिनद्वारे राबवल्यास शास्त्रीय दोहन होते. स्वच्छ दूधनिर्मितीमुळे गोठ्याचा नफा वाढतो.  शेळया-मेंढ्या झाडपाला पसंत करतात म्हणून स्वतः केलेले झाडे-झुडपे रोपण भरपूर चारा पुरवितात. आधी वृक्षारोपण आणि मग शेळीपालन, असा सल्ला अनेकांना नको, कारण एवढा वेळ थांबण्यास कोणालाच वेळ नसतो. शेळ्या-मेंढयाही चाराकुट्टी खातात. मात्र नेहमी सवय लावावी लागते. बंदिस्त मेंढीपालन यशस्वी असणाऱ्या बऱ्याच यशकथा ॲग्रोवन'' मध्ये प्रकाशित झाल्या आहेत. 

शासनाची आपत्ती निवारण यंत्रणा आहे. मात्र, ग्रामीण भागाचे अर्थकारण ढवळून टाकणाऱ्या पशुसंवर्धन विभागाची वेगळी परीपूर्ण आपत्ती व्यवस्थापन प्रणाली सर्वदूर पोचली तरच पशुपालक सहभागी करून सगळे पशुधन व्यवसाय सुरक्षित ठेवता येतील. चारा बॅंक आणि पशुखाद्य सुरक्षितता यातून पशुधन राशन पुरविता येणे शक्‍य आहे. 

डॉ. नितीन मार्कंडेय : ८२३७६८२१४१ (लेखक पशुवैद्यक महाविद्यालय  परभणी येथे कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com