राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२२ : कृषीसह १७ क्षेत्रातील स्टार्टअपकडून केंद्र सरकारने मागवले अर्ज

केंद्र सरकारच्या देशांतर्गत उद्योग आणि व्यापार संवर्धन विभाग म्हणजेच डीपीआयआयटीतर्फे हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष आहे. या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Agriculture Startup
Agriculture Startup
Published on
Updated on

सध्या कृषी आणि कृषी आधारित व्यवसायांकडे शाश्वत उत्पन्नाचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्याचाच परिणाम या क्षेत्रात  नव्या कल्पनांसह अनेकविध स्टार्टअप्स (Startup India) समोर येत आहेत. या स्टार्टअप्सच्या माध्यमातून उत्पादनवाढ आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा मानस आहे. देशातील स्टार्टअप कल्चरला (Startup Culture) प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पुरस्कारही सुरु केले आहेत. कृषीसह (Agriculture Startup) अन्य १७ विविध क्षेत्रातील स्टार्टअप पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांसाठी (National Startup Award) सरकारने अर्ज मागवले आहेत.

#NSA2022 is looking out for innovators who are shaping the future of the Agriculture sector! Applications for Agriculture startups across 4 sub-sectors are open! Apply now: https://t.co/lxS8UkWSzx#StartupIndia pic.twitter.com/2hOYpN76uC

— Startup India (@startupindia)

केंद्र सरकारच्या देशांतर्गत उद्योग आणि व्यापार संवर्धन विभाग म्हणजेच डीपीआयआयटीतर्फे हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष आहे. या  पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. देशात केंद्र सरकारद्वारे 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. या अनुषंगाने यंदा कृषी क्षेत्रातील विकासाला, प्रक्रिया उद्योग क्षेत्राला चालना देणाऱ्या स्टार्टअप्सना पुरस्कार देण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांच्या यापूर्वीच्या दोन वर्षांच्या यशस्वी आयोजनानंतर राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२२ साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ५० उप-क्षेत्रांमध्ये या पुरस्कारांचे वर्गिकरण करण्यात आले असून कृषीसह १७ क्षेत्रांमधील स्टार्टअपसाठी हे पुरस्कार दिले जातील. यामध्ये कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि कौशल्य विकास, ऊर्जा, उद्योग तंत्रज्ञान, पर्यावरण, फिनटेक, अन्न प्रक्रिया, आरोग्य आणि निरामय जीवन, उद्योग ४.०, माध्यम आणि मनोरंजन, सुरक्षा, अंतराळ, वाहतूक आणि प्रवास या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

७ विशेष श्रेणी स्टार्टअप पुरस्कार - राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांसाठी १७ विविध क्षेत्रांशिवाय ७ विशेष श्रेणीतील स्टार्टअपना पुरस्कार देण्यात येणार आहेत.  

- महिलांनी सुरू केलेले स्टार्टअप - ग्रामीण भागात प्रभाव निर्माण करणारे स्टार्टअप - कॅम्पस स्टार्टअप - उत्पादन सर्वोत्कृष्टता - महामारीशी लढा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करणारे स्टार्टअप (प्रतिबंधक, निदान, उपचारात्मक, देखरेख, डिजिटल कनेक्ट, घरून काम करण्यासाठी) - भारतीय भाषांमध्ये कृषी व्यवसायातील समस्या निवारण करणारे स्टार्टअप - ईशान्येकडील स्टार्टअप्स

याशिवाय स्टार्टअपची मजबूत यंत्रणा उभी करण्यासाठी महत्वाचा भाग कारणीभूत ठरणाऱ्या असामान्य इनक्यूबेटरला आणि एक्सिलरेटर्सला देखील नॅशनल स्टार्टअप पुरस्कार २०२२ देण्यात येणार आहे. प्रत्येक विजयी स्टार्टअपला ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. विजेते आणि उपविजेत्यांना या पुरस्काराच्या निमित्त आपल्या कल्पना सादर करण्यासाठी एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. हेही वाचा - रशिया-युक्रेन युध्दामुळे जागतीक अन्नधान्य महागाईची शक्यता विजेत्या इनक्यूबेटरला आणि विजेत्या एक्सिलरेटरला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२२ पर्यंत असणार आहे. या पुरस्कारांसंदर्भातील सर्व माहितीसाठी www.startupindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com