सातारा जिल्ह्यात घरपोच मटण, चिकन विक्रीस प्रारंभ

सातारा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये इतर जिल्ह्यांत मटण, चिकन विक्रीला बंदी नसतानाही सातारा जिल्ह्यात मात्र बंदी होती. यामुळे शेळीपालक, कुक्कुटपालन शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मटण, चिकनच्या घरपोच विक्रीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या व्यावसायिकांनी घरपोच मटण, चिकन विक्री सुरू केली आहे.
संग्रहित छायाचित्र

‘कोरोना’प्रसार रोखण्यासाठी २३ मार्चपासून राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. या कालावधीत अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. हा निर्णय घेताना केंद्र शासनाने मटण व चिकनचा अत्यावश्‍यक गोष्टींच्या यादीमध्ये समावेश केला होता. तशीच भूमिका राज्य सरकारनेही घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही दुकाने सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती.

परंतु, सातारा जिल्ह्यात मटण व चिकन विक्रीला बंदी घालण्यात आली होती.या विक्री बंदीचा फटका शेळीपालक, कुक्कुट पालन शेतकऱ्यांसह विक्रेत्यांना बसला होता. बंदीच्या कालावधीत काही ठिकाणी मटण व चिकनची चोरून विक्री होत होती. त्यामुळे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तसेच चोरून विकणाऱ्या काही दुकानचालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले विक्रेते,शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार संकटात सापडले होते. विक्री बंद असल्याने अनेकांना कोंबड्यांना खाद्य देणेही परवडत नव्हते. त्यामुळे मोफत वाटप करावे लागले. याबाबत मटण विक्रेता संघटनेनेही निवेदन दिले. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच मटण व चिकनच्या घरपोच विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मटण व चिकन विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com