प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात कांदा पिकावर करपा

मी दरवर्षी कांद्याची पाच ते सहा एकरांवर लागवड करतो. यंदा तीन ते चार एकरांवर कांद्याची लागवड केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत बदलत असलेल्या हवामानामुळे कांदा पिकावर करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आर्थिक खर्चातही वाढ झाली आहे. - भाऊसाहेब पळसकर, कर्डे, ता. शिरूर, जि. पुणे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहेत. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुर्भाव २० ते ३० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.    

जिल्ह्यात आत्तापर्यंत २५ हजार ४९० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. अजूनही अनेक ठिकाणी रब्बी कांदा लागवड सुरू आहे. उशिरा खरिपात लागवड झालेले कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहेत. नवीन लावलेला कांदा मॉन्सूनोत्तर पावसामुळे खराब झाला आहे. त्यातच अधूनमधून ढगाळ हवामान होत असून कांदा पातीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली या भागात हा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते. तसेच पिकाच्या गाभ्याचेही नुकसान होत आहे.

करप्याच्या प्रादुर्भावामुळे कांद्याची वाढ खुंटली आहे. पात पिवळी पडली आहेत. कांद्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून फवारणीचा खर्च वाढत आहे. कृषी विभागाकडून उपाय योजनांबाबत गाव पातळीवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. मात्र, करप्याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.   गेल्या काही दिवसांपासून असलेल्या प्रतिकूल हवामानामुळे कांदा, बटाटा पिकांवर करप्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सकाळी पडणारे धुके, दव आदी कारणांमुळे हा प्रादुर्भाव होत असून, शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन फवारण्या कराव्यात, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  बी. जे. पलघडमल यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com