विधान परिषदेतील नऊ सदस्यांची मुदत संपली; उपसभापतीपदही रिक्त

मुंबई : विधानपरिषदेतील नऊ सदस्यांची मुदत शुक्रवारी (ता.२४) संपली असून त्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समावेश आहे. सध्या ‘कोरोना’च्या संकटामुळे टाळेबंदी सुरु असल्याने या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला नाही, मात्र येत्या मे महिन्यात कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता असून त्यानंतर या जागा भरल्या जातील.
संग्रहित छायाचित्र

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह विधानपरिषदेच्या ९ सदस्यांची मुदत शुक्रवारी ( ता.२४) संपली आहे. या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी मार्चमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र राज्यात कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेवून केंद्रीय निवडणूक आयोगाने अनिश्चित कालावधी करिता निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. रिक्त जागांमध्ये भाजपच्या स्मिता वाघ, अरुण अडसड, पृथ्वीराज देशमुख, काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर आणि शिवसेनेच्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com