सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने दोन वर्षांपूर्वी डाळिंबाचे ‘सोलापूर लाल’ आणि ‘सोलापूर अनारदाना’ ही दोन वाणे संशोधित करून महत्त्वाची कामगिरी बजावली. तसेच डाळिंबाच्या बियापासून तेल काढण्याची पद्धती या आधीच विकसित केली आहे. पण, आता त्यापुढे जाऊन आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असणाऱ्या या तेलापासून स्प्रे डाइंग तंत्रज्ञानचा वापर करून स्प्रे डाइंड पावडर आणि सॉफ्टजेल कॅप्सूलची निर्मिती केंद्राने केली आहे. या तेलातील औषधी गुणधर्म अधिककाळ टिकावे आणि त्याचे नेमकेपणाने सेवन करता यावे, हा या तंत्रज्ञानामागचा उद्देश आहे.
डाळिंब उत्पादनात महाराष्ट्र हे आघाडीवरील राज्य आहे. देशातील एकूण लागवडीच्या ८० टक्के म्हणजे सुमारे सव्वा लाख एकरहूनही अधिक क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. डाळिंबापासून ज्यूस, अनारदाना यांसारखे प्रक्रियायुक्त उपपदार्थ सध्या उपलब्ध आहेत. पण, ज्यूसनिर्मितीनंतर वेस्ट म्हणून उरणाऱ्या डाळिंबाच्या बियापासून तेल काढण्याचे संशोधन या आधीच केंद्राने तयार केले आहे.
५० मि.ली.च्या पॅकिंगमध्ये या बॉटल उपल्ब्ध आहेत, पण या तेलामध्ये असणारा ‘कॉन्जुगेटेड लिनोलेनिक ॲसिड’ हा घटक सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास या तेलातील जैविकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या घटकाचे मोठ्या प्रमाणात ऑक्सिडोशन होते, हे नुकसान टाळण्यासाठी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीलेश गायकवाड यांनी या तेलापासून जिलेटिनयुक्त सॉफ्टजेल कॅप्सुल आणि स्प्रे डाईंग तंत्रज्ञानाद्वारे स्प्रे डाइंड पावडर तयार करण्यावर संशोधन केले आणि त्यानुसार हे संशोधन पूर्ण झाले. यामुळे डाळिंब तेलाच्या साठवण क्षमतेत वाढ तर झालीच, पण या तेलातील जैवसक्रिय घटकांना अधिक काळ टिकवून ठेवणेही सोपे झाले.
आयुष मंत्रालयाचे अर्थसाह्य संशोधन केंद्राला हे इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नवी दिल्लीतील राष्ट्रीय औषधी मंडळ, आयुष मंत्रालय यांनी संशोधन प्रकल्पातंर्गत अर्थसाह्य दिले आहे.
सामंजस्य कराराद्वारे मिळणार तंत्रज्ञान संशोधन केंद्राने डाळिंबाच्या बियापासून तेल काढण्याचे तंत्रज्ञान या आधीच विकसित केले आहे. तसेच त्याच्या पेटंटसाठीही (स्वामित्व हक्क) प्रस्ताव संबंधित विभागाला पाठवला आहे. सध्या हे तंत्रज्ञान खासगी किंवा वैयक्तिक उद्योग सामंजस्य कराराने हे तंत्रज्ञान मिळवू शकतात.
कॅप्सुल आणि पावडरचे हे आहेत आरोग्यवर्धक गुणधर्म
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.