औरंगाबाद : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे; तर सरकारकडून मराठवाड्यातील जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नाबाबत असलेल्या अपेक्षांची पूर्ती व्हावी म्हणून लाक्षणिक उपोषण केल्याचे माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि भाजपच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी (ता. २७) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लाक्षणिक उपोषणाची गरज व भूमिका स्पष्ट केली. उपोषणस्थळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, मेघना बोर्डीकर, प्रशांत बंब आदी उपस्थित होते.
या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, की महाविकास आघाडी सरकारने आमच्या सरकारच्या तुलनेत चांगले काम करून दाखवावे ही अपेक्षा आहे. मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक घेऊन आधीच्या सरकारप्रमाणे मराठवाड्याला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. या वेळी एका लहान मुलीच्या हाताने लिंबू सरबत घेऊन पंकजा मुंडे यांनी उपोषण सोडले. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना मागण्यांबाबत लेखी निवेदन दिले. या आहेत प्रमुख मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.