अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी नोंदणी

जिल्ह्यातील शेतीमाल विक्रीच्या दृष्टीने शेतकऱ्यांकडून माहिती जमा केली जात आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांनी वाहतुकीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३८ गट व शेतकरी कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. याद्वारे ९२ ठिकाणी विक्री केंद्र उघडण्यात आली आहेत. या केंद्रांवरुन शनिवारी (ता.२८) एक हजार २१२ क्विंटल भाजीपाला विक्री झाला आहे. शेतीमालाची विक्री सुरळीत होण्यासाठी कृषी यंत्रणा काम करीत आहेत. - मोहन वाघ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अकोला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्याने काही दिवसांपासून शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. प्रामुख्याने शेतातील माल बाजारपेठेपर्यंत पोचविण्यात अडचणी आल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, आता ही परिस्थिती सावरण्यासाठी कृषी यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. अकोला जिल्ह्यात शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असून दीड हजारांवर शेतकऱ्यांनी शेतीमाल पुरवठ्यासाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. यामुळे लवकरच शेतकरी ते ग्राहक अशी साखळी उभी राहिल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन केल्याने बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प झाले होते. परंतु जीवनावश्यक वस्तुंची गरज लक्षात घेता या वस्तुंना संचारबंदीतून वगळण्यात आले. मात्र, असे असले तरी आदेश असूनही पोलिस प्रशासनाकडून सुरुवातीला अडवणूक झाली. परंतु वेळोवेळी शासनाकडून आदेश निघाल्याने आता ही साखळी सुरळीत होण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भाजीपाला, फलोत्पादकांची नोंदणी सुरु केली आहे. आतापर्यंत दीड हजारांवर शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध मालाची माहिती नोंदविली आहे. 

शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे कोणता भाजीपाला किती किलो आहे, फळे किती आहेत याबाबत माहिती देऊन जवळच्या बाजारपेठेबाबतही अपेक्षा व्यक्त केली. ही सर्व माहिती जमा करण्यात आली आहे. भाजीपाला, फळे थेट ग्राहकापर्यंत पोचविण्यासाठी महापालिका आयुक्त, नगरपालिकांचे अधिकारी यांच्या सहकार्याने विक्रीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टसिंग ठेवत व खबरदारी घेत भाजीपाला, फळे विक्री करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com