शेतीविषय तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर आवश्यक : राजाराम देशमुख

नगर ः बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांपुढील आव्हानांमध्ये वाढ झालेली आहे. शेतीमालाला बाजारपेठ मिळविणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच गारपीटीसारखी समस्या निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्याने काय काळजी घ्यायची याविषयी प्रसार माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य असा संदेश देता आला पाहिजे. आज चारही विद्यापीठांकडून नवनवीन वाण तसेच तंत्रज्ञान प्रसारित केले जात आहे. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न वाढलेले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रसार माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी व्यक्त केले.
माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख

महात्मा फुले कृषि विद्यापीठात प्रसारमाध्यमांचा कृषी तंत्रज्ञान प्रसारात प्रभावी वापर या विषयावर शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विद्यापीठाचे कर्मचारी-अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ, कृषी विभाग, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते. अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव तथा प्रमुख, कृषी विस्तार शिक्षण विभाग डॉ. प्रमोद सावंत, मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. मिलिंद अहिरे, डॉ. सुभाषचंद्र शिंदे उपस्थित होते.

यावेळी कुलगुरु डॉ. विश्वनाथा म्हणाले,की विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात प्रसार माध्यमांचा महत्त्वाचा वाटा आहे. विद्यापीठाने तयार केलेले पिकांचे नवनवीन वाण, तंत्रज्ञानाच्या शिफारशी या जर शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचल्या तर ते पिकांचे उत्पन्न वाढण्यासाठी खूप महत्त्वाचे योगदान असणार आहे. यावेळी डॉ. सेवक ढगे यांनी सुत्रसंचालन केले. मुकुंद शिंदे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com