पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर सोमवारी (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर ढगांची रेलचेल झाली होती. आज (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊन शुक्रवारपासून (ता. ६) राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मॉन्सूनचा अास असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे सरकल्याने राज्यात पावसाचा जोर आेसरला आहे. पश्चिम किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा आणि पूर्व किनारपट्टीवर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे सोमवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. काेकणातील देवगड येथे सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मॉन्सूनचा आस गुरुवारपर्यंत उत्तरेकडेच राहणार आहे. त्यानंतर मात्र राज्यात पावसाला पोषक हवामान होण्याचे संकेत अाहेत. शुक्रवारी राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोमवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत कृषी विभाग)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.