ढगाळ, कोरड्या हवामानासह थंडीत वाढ

अाठवड्याचे हवामान
अाठवड्याचे हवामान

महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर राहील, तर तेथून पूर्वभागावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील. संपूर्ण महाराष्ट्र, मध्य भारत व राजस्थानवर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे थंडीचे प्रमाण सर्वत्र मध्यम स्वरूपाचे राहील. उत्तर भारतात हवेच्या दाबात वाढ होऊन १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील आणि उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भावर तितकाच हवेचा दाब राहील. त्यामुळे थंडीत पुन्हा वाढ होईल. मात्र  हवेच्या दाबात बदल होतील आणि संपूर्ण भारतावर महाराष्ट्रासह १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील, त्यामुळे थंडीचे प्रमाण सर्वत्र मध्यम स्वरूपाचे राहील. ३१ जानेवारी रोजी ही स्थिती कायम राहील. दक्षिण अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असल्याने अरबी समुद्राच्या भागात हवेचे दाब कमी होण्यास सुरवात होत असून, हे चिन्ह पूर्वमोसमी पाऊस होण्याचे संकेत स्पष्ट करीत आहे. त्यामुळे या वर्षीच्या उन्हाळी हंगामात पूर्वमोसमी पावसाची शक्‍यता राहील. वादळी वाऱ्याची अथवा चक्राकार वाऱ्यांची शक्‍यता नाही. मराठवाड्यात किमान तापमान परभणी व हिंगोली जिल्ह्यात १० अंश सेल्सिअसच्या जवळपास राहील. उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. त्याचप्रमाणे गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील. नागपूर व भंडारा जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस राहील. अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व पश्‍चिम महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. संपूर्ण महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील. थंडीचे प्राबल्य कायम राहील. हवामान कोरडे राहील.

कोकण ः रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, ठाणे जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ टक्के राहील. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६३ टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील आणि संपूर्ण कोकणातील सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १९ टक्के इतकी राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ किलोमीटर राहील. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. हवामान थंड राहील.

उत्तर महाराष्ट्र ः जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. उर्वरित नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक व धुळे जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता केवळ २९ टक्के राहण्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ टक्के राहील. दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. जळगाव जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ टक्के तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात केवळ १२ टक्के राहण्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याची दिशा पूर्वेकडून तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. मराठवाडा ः जालना व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस आकाश अंशतः ढगाळ राहील. बीड, नांदेड, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३३ अंश सेल्सिअस इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. उस्मानाबाद, लातूर व परभणी जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात केवळ १२ ते १३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १२ किलोमीटर राहील तर उर्वरित जिल्ह्यात तो ५ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यातच पूर्वेकडून, जालना जिल्ह्यात इशान्येकडून तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील. पूर्व विदर्भ ः वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व अकोला जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. अकोला ज्ह्यिात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ टक्के राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. मध्य विदर्भ ः नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर वर्धा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वर्धा जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के राहील. तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात ६० टक्के राहील. नागपूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के आणि यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.   दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि सोलापूर व नगर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील तर कोल्हापूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअस राहील व नगर व पुणे जिल्ह्यात किमान तापमान ११ ते १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सोलापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ टक्के राहील. सातारा जिल्ह्यात ४१ टक्के राहील आणि कोल्हापूर जिल्ह्यात ५६ टक्के राहील. तर सांगली, पुणे व नगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६६ टक्के इतकी राहील. सांगली जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात हवामान दुपारी अत्यंत कोरडे राहील व सापेक्ष आर्द्रता १० ते २० टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किलोमीटर राहील व वाऱ्याची दिशा इशान्येकडून राहील. कृषी सल्ला ः

  • रब्बी ज्वारी परिपक्व झाली असल्यास काढणी करावी. मात्र दाणे चिकात असल्यास आणखी ८ ते १० दिवस थांबून दाणे पक्व झाल्यानंतर काढणी करावी. कणसे काढून उन्हात तापू द्यावीत आणि त्यानंतर मळणी करावी.
  • हळदीचा पाला पिवळा पडला असल्यास पाला कापून घ्यावा. त्यानंतर कुदळीने खणून फण्या वेगळ्या करून प्रेशर कुकरमध्ये किंवा काहीलीमध्ये शिजवून उन्हात वाळत घालाव्यात.
  • हरभऱ्याचे घाटे भरलेले असल्यास वेळेवर काढणी करावी.
  • ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अाणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com