पिकाच्या सघन वाढीमुळे तण नियंत्रण शक्य
तणांच्या नियंत्रणासाठी अधिक घनतेमध्ये गहू पिकाची लागवड करण्याचे तंत्र उपयुक्त ठरू शकते, असे निष्कर्ष ऑस्ट्रेलियातील सिडन विद्यापीठातील संशोधनामध्ये दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियातील गहू पिकामध्ये आढळणाऱ्या चार प्रमुख तणांविषयी खास अभ्यास करण्यात आला. या नव्या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल वीड सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मजुरांच्या कमरतेमुळे तणांचे नियंत्रण ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरत आहे. त्यातच अनेक तणांनी सध्या उपलब्ध तणनाशकांसाठी प्रतिकारकता विकसित केली आहे. नव्या तणनाशकांचा शोध सध्या घेत जात असला तरी तणांच्या नियंत्रणासाठी रसायन विरहित पद्धतींचाही शोधही आवश्यक ठरत आहे. सिडनी विद्यापीठातील संशोधक मायकेल वॉल्श यांनी पिकांची घनता वाढवून, त्याचे चार तण प्रजातींच्या बायोमास आणि बियांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. ही तणे ऑस्ट्रेलियातील गहू पिकामध्ये प्राधान्याने आढळतात.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.