नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा अहवाल फेटाळला

नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा अहवाल फेटाळला
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा अहवाल फेटाळला

नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर थकबाकीदार रेणुका महिला सहकारी सूतगिरणी संदर्भातील चाचणी लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. तो फेटाळण्यात आला. 

जिल्हा बँकेची मासिक सभा अध्यक्ष केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बँकेच्या माध्यमातून ३४७ कोटींचे अनियमित कर्ज वितरण केल्याने आजी माजी संचालकांसह सुमारे ७२ अधिकाऱ्यांची कलम ८८ नुसार चौकशी सुरू आहे. यामध्ये ज्या संस्थांना कर्ज वितरित करण्यात आले, त्यापैकी मालेगाव तालुक्यातील रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेला २०१२-१३ या आर्थिक वर्षात ७ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. या कर्जाची वसुली वेळेत न झाल्यामुळे थकबाकी १६ कोटी ५३ लाखांवर गेली. थकबाकी वसूल करण्यासाठी जिल्हा बँकेने संस्थेची मालमत्ता जप्त केली.

या प्रकरणात संबंधित संस्थेवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनला पत्र देण्यात आले. मात्र पत्रात आर्थिक फसवणूक कशी झाली, याचा उल्लेख नसल्याने पोलिसांनी जिल्हा बँकेकडे अहवालाची मागणी केली. त्यानुसार जिल्हा बँकेने विभागीय सहनिबंधकांकडे मागणी करून अहवाल मागितला होता. सहकार विभागाचे विशेष लेख परीक्षक जी. बी. वाघ यांनी लेखापरीक्षण करून विभागीय सहनिबंधकांना जानेवारी महिन्यात अहवाल सादर केला. हा अहवाल त्यानंतर बँकेलाही प्राप्त झाला.

संबंधित अहवाल जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासमोर ठेऊन रेणुकादेवी सूतगिरणी संस्थेला दिलेल्या कर्जाचा विनियोग कसा करण्यात आला, याची नोंद नसल्याचा आक्षेप घेत अहवाल विभागीय सहनिबंधकांकडे परत पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या संस्थेवर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com