काँग्रेस-राष्ट्रवादीचा सांगलीत ‘दिग्विजय’ 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा  सांगलीत ‘दिग्विजय’ Congress-NCP Sangli 'Digvijay'
काँग्रेस-राष्ट्रवादीचा  सांगलीत ‘दिग्विजय’ Congress-NCP Sangli 'Digvijay'

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने पालिकेच्या इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता अडीच वर्षांत उलथली आहे.

भाजपचे सात सदस्य फुटले होते, त्यापैकी पाच जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले, तर दोघे गैरहजर राहिले. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ तर धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी काम पाहिले. 

महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी साडेअकरा वाजता प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरुवात झाली. ऑनलाइन होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कोल्हापुरातून तर भाजपच्या सदस्यांनी खरे क्‍लब हाऊसमधून मतदान केले. साडेअकरा वाजता प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरुवात झाली. त्यानंतर पंधरा मिनिटे अर्ज माघारीसाठी होती. त्यानंतर दिलेल्या लिंकद्वारे बारा वाजता ऑनलाइन मतदान झाले.

गेले चार दिवस भाजपचे सदस्य ‘नॉट रिचेबल’ होते. त्यामुळे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि गजानन मगदूम साशंक होतेच. महापौरपदासाठीचा आघाडीचा उमेदवार कॉँग्रेसचा की राष्ट्रवादीचा या बाबतचा सस्पेन्सही कायम होता. कॉँग्रेसच्या उत्तम साखळकर व राष्ट्रवादीच्या मैन्नुदीन बागवान यांनी माघार घेत दिग्विजय सूर्यवंशी यांचा मार्ग मोकळा केला.

भाजपकडे ४२ जणांचे बहुमत होते. मात्र त्यांची सकाळपर्यंतची जुळणी ३६ जणांपर्यंतच झाली होती. दोन सहयोगी सदस्यांपैकी भाजपचे उपमहापौरपदाचे उमेदवार मगदूम होते. अन्य सहयोगी सदस्य विजय घाडगे यांनी कॉँग्रेस आघाडीला मतदान केले. त्यांच्या शिवाय नसीम नाईक, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, महेंद्र सावंत यांनीही राष्ट्रवादीला मतदान केले. त्यामुळे भाजपच्या चार मतांसह त्यांची हक्काची एकूण सात मते फुटली आणि भाजपचे संख्याबळ ३६ वर घसरले.  जयंत पाटील यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’  निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जनतेने भाजपला दिलेल्या सत्तेत स्वारस्य नाही, असे सांगत प्रारंभी जयंत पाटील यांनी भाजपला गाफील ठेवले. मात्र संधी येताच करेक्‍ट कार्यक्रम केला. जयंत पाटील यांच्या खेळीने भाजपला नेस्तनाबूत केले. भाजपची पूर्ण बहुमताने आलेली सत्ता प्रथमच उलथवली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com