नागपुरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

सरकारी नियमानुसार ११० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो. तर मंगळवारी (ता.२१) सकाळी जिल्हाभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे.
नागपुरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी Wet drought in Nagpur Demand to declare
नागपुरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी Wet drought in Nagpur Demand to declare

नागपूर : सरकारी नियमानुसार ११० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो. तर मंगळवारी (ता.२१) सकाळी जिल्हाभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. अति पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे.  नागपूर शहर वगळता संपूर्ण जिल्ह्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांनी जिल्ह्यात मॉन्सून व पर्जन्यमानाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून दिली. खासदार तुमाने म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी सर्वांत कमी पाऊस काटोल व नरखेड तालुक्यात पडतो. मात्र या वेळी या दोन्ही तालुक्यांत आतापर्यंत ११९ टक्के पाऊस झाला आहे. या शिवाय हिंगणा, कळमेश्‍वर, भिवापूर, कामठी, सावनेर या तालुक्यांत ओला दुष्काळाची परिस्थिती आहे. तर उर्वरित ६ पैकी नागपूर ग्रामीण, कुही, उमरेड, मौदा या ४ तालुक्यांमध्येही ओल्या दुष्काळाचे संकट ओढवणार आहे. शासकीय निकषानुसार ज्या तालुक्यात ११० मिमी.पेक्षा अधिक पाऊस झाला असेल, अशा तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ पडतो. नागपूर जिल्ह्यात १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सरासरी १०६४.१ मिमी. तर सप्टेंबरअखेर पर्यंत १०१.०१ टक्के सरासरी ९२०.४ मिमी. पाऊस पडतो. परंतु या वर्षी जिल्ह्यात २० सप्टेंबरपर्यंतच १०८.२७ टक्के ९२९.७ मिमी. पाऊस झाला आहे. तब्बल ७ तालुक्यांमध्ये ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे तेथील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.’’  पिके वाया गेल्याने शेतकरी अडचणीत  जिल्ह्यात २,१०,९४४ हेक्टर कापूस, ९२,७६४ हेक्टर सोयाबीन, ६३,९१७ हेक्टर तुरीची, तर ९३,८२१ हेक्टरवर धानाची लागवड झाली होती. तसेच हजारो हेक्टर संत्रा व मोसंबीचे पीक आहे. मागील २० दिवसांत सुमारे ३०० मिमी. पाऊस झाला आहे. जमिनीत सतत ओल असल्यामुळे आणि जमिनीतून पाणी पाझरत असल्याने संत्रा, कापूस, सोयाबीन व तुरीसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अशक्य आहे.

 अनेक गावांत अतिवृष्टी  जिल्ह्यातील अनेक गावांत अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. नरखेड तालुक्यातील अनेक गावांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. संत्रा पिकावर विविध रोग आले आहेत. रामटेक तालुक्यात अनेक गावांत अधिकचा पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. मात्र जिल्हा प्रशासन पावसामुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाच्या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी पुन्हा उघड्यावर शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com