शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू : विश्वजित कदम

गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडला. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांचे नुकान झाले आहे. तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिले.
We will help farmers as much as possible: Vishwajit Kadam
We will help farmers as much as possible: Vishwajit Kadam

सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडला. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांचे नुकान झाले आहे. तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिले.  सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले. त्यापार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या बांगाची पाहणी सोमवारी (ता. ६) सोनी (ता. मिरज) येथे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी, तर तासगाव तालुक्यातील मणेराजुरी या गावातील बाधित झालेल्या द्राक्षाची पाहणी केली. या वेळी कृषी आयुक्त धीरजकुमार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोज वेताळ, दिनकर पाटील, जीवन पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले, ‘‘गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या माहामारीला सामोरे जात आहोत. या काळातही शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यातच गेल्या वर्षभरात अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात म्हणून निधी उपलब्ध करून दिला आहे.’’  डिसेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे नवीन अडचणी सरकार समोर आल्या आहेत. परंतु त्या अडचणीवर मात करण्यासाठी सरकार सक्षम आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकार मदत करेलच. आवश्यकता पडली तर केंद्र सरकारकडून मदत घेऊन शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम सरकार करेल. सध्या झालेल्या पावसामुळे पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य स्तरावर मंत्रिमंडळाची चर्चा करून जास्तीत जास्त मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेऊ,असेही कदम म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com