बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल 

बुलडाणा ः जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन २४ रूग्ण बाधीत झाले होते. मात्र, वेळीच उपाययोजना व खबरदारी घेतल्याने जिल्ह्यात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सोमवारी (ता. चार) चिखली येथील एका रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे सुटी देण्यात आली. २४ पैकी २० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
On the way to the coronation of bulldhana
On the way to the coronation of bulldhana

बुलडाणा ः जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन २४ रूग्ण बाधीत झाले होते. मात्र, वेळीच उपाययोजना व खबरदारी घेतल्याने जिल्ह्यात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सोमवारी (ता. चार) चिखली येथील एका रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे सुटी देण्यात आली. २४ पैकी २० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

जिल्ह्यात चिखली येथे तीन, चितोडा (ता. खामगांव) येथे दोन, शेगाव येथे तीन, देऊळगावराजा येथे दोन, सिंदखेडराजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे नऊ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील पाच, शेगांव येथील तीन, चितोडा (ता. खामगांव) येथील दोन, चिखली येथील दोन, मलकापूर येथील चार, दे.राजा येथील दोन आणि सिंदखेड राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज एका रूग्णाची भर पडली आहे. आज चिखली येथील एक रूग्ण बरा होवून स्वगृही परतला आहे. अशाप्रकारे एकूण २० रूग्ण बरे झालेले आहे. 

प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे एका रूग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्याला आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णाचे स्वागत केले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. 

प्रशासनाला सहकार्य करा  नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडल्यास सुरक्षित अंतराचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. डॉक्टर, पोलिस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com