`मांजरा`च्या पाण्याला बाष्पीभवनाचा फटका

`मांजरा`च्या पाण्याला बाष्पीभवनाचा फटका
`मांजरा`च्या पाण्याला बाष्पीभवनाचा फटका

लातूर : लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढत्या तापमानाचाही फटका या धरणातील पाण्याला बसत आहे. कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या दहा दिवसांत सरासरी ०.०६५ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळे या धरणातून पाणी घेणार्य़ा महापालिकेपासून इतर यंत्रणांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. 

केवळ २० दशलक्षघनमीटर पाणी या धरणात मृतसाठ्यातच पाणी राहिले आहे. सप्टेंबर आक्टोबरपासून धरणातील मृतसाठ्यातून लातूर तसेच इतर पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा केला जात आहे. धरणात सध्या केवळ २०.७०६ दशलक्षघनमीटरच पाणीसाठा शिल्लक आहे.

वाढत्या तापमानाचा फटका गेल्या काही दिवसांपासून दररोज ३८ ते ४० डिग्री अंश सेल्सिअस तापमान आहे. कडक उन्हाचा धऱणातील पाण्याला फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ०.०६५ दशलक्षघनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. आणखी दीड महिने उन्हाळा आहे. उन्हाची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे बाष्पीभवनी वाढणार आहे.  यंत्रणांना गांभीर्यच नाही धरणातील पाणी कमी होत चालले आहे. त्यात बाष्पीभवनाचाही फटका बसत आहे. तरीदेखील धरणातील पाणी उचलणार्या महापालिकेसह इतर यंत्रणेला याचे गांभीर्य नाही. काटकसरीने पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसत नाही. अशीच परिस्थिती राहिली तर पावसाळ्यातच शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

दहा दिवसांत झालेले बाष्पीभवन

१ एप्रिल ०.०६३ दशलक्षघनमीटर
२ एप्रिल ०.०६२ दशलक्षघनमीटर
३ एप्रिल ०.०६४ दशलक्षघनमीटर
४ एप्रिल ०.०६४ दशलक्षघनमीटर
५ एप्रिल ०.०६५ दशलक्षघनमीटर
६ एप्रिल ०.०६५ दशलक्षघनमीटर
७ एप्रिल ०.०६५ दशलक्षघनमीटर
८ एप्रिल ०.०६६ दशलक्षघनमीटर
९ एप्रिल ०.०६६ दशलक्षघनमीटर
१० एप्रिल ०.०६६ दशलक्षघनमीटर

गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. येत्या काळात उन्हाची तीव्रता अधिक वाढली तर बाष्पीभवनही वाढणार आहे. त्यामुळे या धरणातून पाणी घेणाऱ्या सर्वच यंत्रणांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. - शाहूराज पाटील, शाखा अभियंता, मांजरा धरण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com