पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा शेतकऱ्यांना फटका  Veterinary work stoppage The agitation hit the farmers
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा शेतकऱ्यांना फटका  Veterinary work stoppage The agitation hit the farmers

पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा शेतकऱ्यांना फटका 

पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६ जुलैपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. याचा फटका पशुपालक शेतकऱ्यांना बसत आहे. उपचाराअभावी गुरांचे उपचार करणे अशक्य झाले आहे.

रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६ जुलैपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. याचा फटका पशुपालक शेतकऱ्यांना बसत आहे. उपचाराअभावी गुरांचे उपचार करणे अशक्य झाले आहे. संप काळातही राज्य शासनाच्या राजपत्रात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेला २२ सेवा देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. पशुचिकित्सक कोणत्याही सेवा देत नसल्यामुळे आजारी गुरांचे मृत्यू होत असल्याने याचा फटका मात्र पशुपालक शेतकऱ्यांना बसत आहे.  खासगी व शासकीय सेवेतील पदविकाधारक पशुचिकित्सक संघटनांनी काम बंद आंदोलन पावसाळ्यात पुकारल्यामुळे शासन व संबंधित विभागापेक्षा शेतकरीच वेठीस धरला गेला आहे. सध्या पावसाळ्यात जनावरांना लसीकरण करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आजारी गुरांवर औषधोपचाराची गरज आहे. शेतकऱ्यांकडून गुरांवर उपचार होत नसल्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. मागील आठवड्यात भोकरखेडा येथे एक दुभती गाय, हराळ येथे नुकतीच व्यालेली म्हैस तर याच गावात काही बकऱ्या मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. पशू पदविकाधारकांच्या मागण्यांबाबत शासनाने योग्य तो तोडगा काढावा व शेतकऱ्यांचे लाखमोलाचे पशुधन वाचवावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही केली आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com