एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाचा अवलंब करा : डॉ. सोनवणे

एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाचा अवलंब करा : डॉ. सोनवणे
एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाचा अवलंब करा : डॉ. सोनवणे

नाशिक : ‘‘भाजीपाला पिकांवरील कीड, रोग रोखण्यासाठी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे रासायनिक औषधांवर होणारा खर्च वाचून पिकांवरील दुष्परिणाम टळतात. पिकाच्या उत्पादन क्षमतेत वाढ होते,’’ असे पिंपळगाव बसवंत येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्रातील कीड व रोग प्राध्यापक डॉ. राकेश सोनवणे यांनी सांगितले. 

‘अँग्रोवन' आणि 'महाधन'तर्फे 'आधुनिक शेतीतील ज्ञानगंगेचा विस्तार' या कार्यक्रमांतर्गत 'भाजीपाला कीड व रोग तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन'या विषयावर जोरण (ता. बागलाण) येथे चर्चासत्र झाले. अध्यक्षस्थानी सरपंच सुभाष सावकार होते. ‘महाधन’चे विभाग व्यवस्थापक विकास खैरणार, आदर्श गावचे प्रणेते केदार काकुळते, रमेश सावकार उपस्थित होते. 

सोनवणे म्हणाले,  ‘‘पिकांची फेरपालट, योग्य लागवडीचा काळ, रोपातील अंतर, जमिनीची निवड, सुयोग्य खतांचे नियोजन आदीचा योग्य अवलंब केल्यास भाजीपाला पिकांचे नुकसान कमी होते. तसेच उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होण्यास मदत होते.’’

"भाजीपाला या पिकांवर अनेक प्रकारच्या रोग किडीचा प्रार्दुभाव होतो. लवकर येणारा करपा, लेट करपा, बोकड्या, बिल्ट व्हायरस यांसारखे रोग येतात. ते न येण्यासाठी बीजप्रक्रिया, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, योग्य पाणी नियोजन, तणांचा बंदोबस्त, ट्रायकोडर्मा, जिवाणू खतांचा वापर, निरोगी रोपे, रासायनिक औषधांचा योग वापर करावा’’, असा सल्ला सोनवणे यांनी शेतकऱ्यांना दिला. 

महाधन खतांचा उत्पादनवाढीसाठी वापर करावा, असे खैरणार यांनी सांगितले. श्रीनिवास जंगम यांनी सूत्रसंचालन केले. सुनील रौंदळ यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com